Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : आसारामबापू आश्रमात मोठा स्फोट; एकाचा मृत्यू, चारजण झालेत जखमी

भोपाळ : मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. आसाराम बापूच्या आश्रमात अन्न शिजवत असताना बॉयलरमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला आहे, तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Loading...
Advertisement

स्फोटानंतर दहशतीचे वातावरण आहे. स्फोट एवढा जोरदार होता की भिंतीला छिद्र पडले. विटा विखुरल्या आहेत. पोलिस प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अपघाताचा तपास करत आहेत. त्याचबरोबर मीडियाला आत प्रवेश दिला जात नसल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आसाराम आश्रमाच्या संचालिका दर्शना यांनी सांगितले की, सकाळी बॉयलरचा स्फोट झाला. यामध्ये चार महिला जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, बॉयलर खराब आहे, त्यासाठी मेकॅनिकला बोलावण्यात आले होते. मेकॅनिक बॉयलर दुरुस्त करत होता, त्याच दरम्यान स्फोट झाला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अतिरिक्त एसपी संजीव सिंह यांनी सांगितले की, आसारामचा आश्रम परशिया रोडवर आहे. यामध्ये सुमारे 300 मुले शिक्षण घेतात. स्वयंपाक करताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये अहमदाबादहून आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर 4 महिला जखमी झाल्या आहेत. सध्या या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply