Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. म्हणून राज ठाकरे यांनी दिलाय इशारा; पहा, राज्य सरकारच्या निर्णयावर काय दिलीय प्रतिक्रिया

मुंबई : राज्य सरकारने राज्यातील 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकाना आणि आस्थापनांच्या पाट्या मराठी भाषेत असणे बंधनकारक राहणार आहे, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयावरुन राजकारण सुरू झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्य सरकारला इशारा दिला आहे.

Advertisement

या निर्णयावरुन श्रेय घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या अन्य पक्षांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. या मुद्द्यावर राज ठाकरे म्हणाले, की राज्यात दुकानांवर मराठीत पाट्या असाव्यात यासाठी खरे तर आंदोलन करण्याची वेळ येऊ नये. परंतु, 2008 आणि 2009 मध्ये मराठीत पाट्या असाव्यात यासाठी मनसेने आंदोलने केली. सरकारने आता हा निर्णय घेतला तेव्हा त्याचे श्रेय फक्त आणि फक्त महाराष्ट्र सैनिकांचे आहे. त्या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी अन्य पक्षांना इशारा दिला आहे.

Loading...
Advertisement

तसेच महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन. आता निर्णयाची अंमलबजावणी नीट करा. ह्यात आणखी एक भानगड सरकारने सुरू ठेवली आहे की मराठी भाषेबरोबरच अन्य भाषा नामफलकांवर चालतील. ह्याची काय गरज आहे ? राज्याची भाषा देवनागरीतील मराठी आहे. देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार आणि ह्याची आठवण पुन्हा करायला लावू नका, असा इशाराही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान, या मुद्द्यावर अद्याप अन्य राजकीय पक्षांनी प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत.  त्यामुळे या मुद्द्यावर अन्य राजकीय पक्ष काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

राज्य सरकारबाबत राज ठाकरे यांचे महत्वाचे विधान; पहा, नेमके काय म्हटलेय त्यांनी

Advertisement
Advertisement

Leave a Reply