Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Election 2022 : ‘त्या’ राजकारणात विरोधकांनीही साधलीय बरोबरी; आघाडीवरील भाजपला दिले जोरदार धक्के

नवी दिल्ली : देशाताल 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये भाजपशासित उत्तर प्रदेशातील निवडणुका जास्त चर्चेत आहेत. त्यामुळे सध्या या राज्यात राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. फोडाफोडीचे राजकारण जोरात सुरू आहे. सत्ताधारी पक्षातील आमदार आणि मंत्र्यांना राजीनामा द्यायला लावून विरोधी पक्षांनी भाजपला जोरदार झटका दिला. या राजकारणात भाजप काही काळ मागे पडत असल्याचे दिसत होते. मात्र, त्यानंतर भाजपनेही जशास तसे उत्तर देत विरोधी पक्षांतील काही मोठे नेते पक्षात आणले आहेत.

Advertisement

या फोडाफोडीच्या राजकारणात आधी भाजप आघाडीवर होता. आता मात्र विरोधी पक्षांनीही बरोबरी साधली आहे. गेल्या तीन महिन्यांत भाजपने सपा, बसपा आणि काँग्रेसच्या 11 आमदारांना पक्षात घेतले. त्याचवेळी भारतीय जनता पक्षातील 11 आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यापैकी चार आमदार समाजवादी पार्टीत तर एक आमदार आरएलडीमध्ये दाखल झाला आहे.

Advertisement

भाजपने सपाचे विधानपरिषद सदस्य नरेंद्र सिंह भाटी, शतरुद्र प्रकाश, रामा निरंजन, रविशंकर सिंह पप्पू आणि सीपी चंद्रा यांचा भाजपमध्ये समावेश केला आहे. बुधवारी फिरोजाबादमधील सिरसागंजमधील सपा आमदार हरि ओम यादव यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या सात आमदारांपैकी हरचंदपूर रायबरेलीचे राकेश प्रताप सिंह आणि बेहट सहारनपूरमधून नरेश सैनी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, या वर्षात देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. शनिवारी दुपारी निवडणूक आयोगाने या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. कोरोनाचे संकट असताना या निवडणुका होत असल्याने निवडणूक आयोगान विशेष खबरदारी घेतली आहे. उत्‍तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब (Punjab), उत्‍तराखंड (Uttarakhand), गोवा (Goa) आणि मणिपूर (Manipur) या राज्यांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

Advertisement

उत्‍तर प्रदेशात 14 जानेवारीला अधिसूचना जारी होणार आहे. या राज्यात एकूण 7 टप्प्यात मतदान होणार आहे. 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 03 मार्च आणि 07 मार्च या टप्प्प्यात मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी निवडणुकीचे निकाल घोषित होणार आहेत. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या तिन्ही राज्यात 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मणिपूरमध्ये मात्र दोन टप्प्यात मतदान होणार आहे. या राज्यात 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च या दोन टप्प्यात मतदान होईल. 15 जानेवारीपर्यंत कोणत्याही सभा, पदयात्रा, सायकल यात्रा घेता येणार नाहीत. याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी सांगितले.

Advertisement

भाजपनंतर समाजवादी पार्टी आणि काँग्रेसलाही हादरे..! दिग्गज नेत्यांचा भाजप प्रवेश; जाणून घ्या, अपडेट

Advertisement
Advertisement

Leave a Reply