Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भाजपनंतर समाजवादी पार्टी आणि काँग्रेसलाही हादरे..! दिग्गज नेत्यांचा भाजप प्रवेश; जाणून घ्या, अपडेट

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या राजकारणात सत्ताधारी भाजपनंतर विरोधकांनाही फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका बसला आहे. विरोधी पक्षांनी भाजप सरकारमधील मंत्री आणि आमदारांना राजीनामा द्यायला लावून भाजपला जोरदार झटके दिले होते. त्यानंतर आता भाजपनेही तसेच राजकारण करत समाजवादी पार्टी आणि काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे.

Advertisement

भाजपने उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचे व्याही आणि फिरोजाबादमधील सिरसागंज मतदारसंघाचे आमदार हरिओम यादव यांना पक्षात प्रवेश दिला आहे. तसेच सहारनपूर जिल्ह्यातील बेहट येथील काँग्रेस आमदार नरेश सैनी आणि समाजवादी पार्टीचे माजी खासदार धर्मपाल सैनी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Advertisement

आमदार यादव सध्या समाजवादी पार्टीतून निलंबित आहेत. त्यांना फेब्रुवारी 2021 मध्ये सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत यादव यांनी भाजपला मदत केली होती. त्यामुळे फिरोजाबाद मध्ये भाजपला यश मिळाले होते. यादव समाजवादी पार्टीचे प्रमुख नेते होते. आता मात्र त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, या वर्षात देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. शनिवारी दुपारी निवडणूक आयोगाने या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. कोरोनाचे संकट असताना या निवडणुका होत असल्याने निवडणूक आयोगान विशेष खबरदारी घेतली आहे. उत्‍तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब (Punjab), उत्‍तराखंड (Uttarakhand), गोवा (Goa) आणि मणिपूर (Manipur) या राज्यांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

Advertisement

उत्‍तर प्रदेशात 14 जानेवारीला अधिसूचना जारी होणार आहे. या राज्यात एकूण 7 टप्प्यात मतदान होणार आहे. 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 03 मार्च आणि 07 मार्च या टप्प्प्यात मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी निवडणुकीचे निकाल घोषित होणार आहेत. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या तिन्ही राज्यात 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मणिपूरमध्ये मात्र दोन टप्प्यात मतदान होणार आहे. या राज्यात 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च या दोन टप्प्यात मतदान होईल. 15 जानेवारीपर्यंत कोणत्याही सभा, पदयात्रा, सायकल यात्रा घेता येणार नाहीत. याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी सांगितले.

Advertisement

उत्तर प्रदेशात भाजपला आणखी एक धक्का..! मंत्र्याने दिला राजीनामा; फोडाफोडीचे राजकारण जोरात

Advertisement
Advertisement

Leave a Reply