Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

उत्तर प्रदेशात भाजपला आणखी एक धक्का..! मंत्र्याने दिला राजीनामा; फोडाफोडीचे राजकारण जोरात

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या राजकारणात सध्या सत्ताधारी भाजपला एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. कालच सरकारमधील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य आणि आमदार ब्रृजेश प्रजापति यांनी राजीनामा दिल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला जोरदार झटका बसला. या धक्क्यातून सावरत डॅमेज कंट्रोल सुरू असतानाच आज आणखी एक जोरदार झटका बसला आहे. कारण, आज भाजप सरकारमधील आणखी एक मंत्री दारा सिंह चौहान यांनी राजीनामा दिला आहे.

Advertisement

स्वामी प्रसाद मौर्य यांच्याप्रमाणे दारा सिंह चौहान हे देखील भाजपमध्ये येण्यापूर्वी बहुजन समाज पक्षाचे (BSP) नेते होते. 2015 मध्ये त्यांनी बसपा सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. तीन वेळा खासदार राहिलेल्या चौहान यांना भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपचे सदस्यत्व दिले होते. मधुबन विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर त्यांना राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले. चौहान आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, काल राजीनामा दिलेले मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली.

Advertisement

दरम्यान, या वर्षात देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. शनिवारी दुपारी निवडणूक आयोगाने या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. कोरोनाचे संकट असताना या निवडणुका होत असल्याने निवडणूक आयोगान विशेष खबरदारी घेतली आहे. उत्‍तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब (Punjab), उत्‍तराखंड (Uttarakhand), गोवा (Goa) आणि मणिपूर (Manipur) या राज्यांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

Loading...
Advertisement

उत्‍तर प्रदेशात 14 जानेवारीला अधिसूचना जारी होणार आहे. या राज्यात एकूण 7 टप्प्यात मतदान होणार आहे. 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 03 मार्च आणि 07 मार्च या टप्प्प्यात मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी निवडणुकीचे निकाल घोषित होणार आहेत. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या तिन्ही राज्यात 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मणिपूरमध्ये मात्र दोन टप्प्यात मतदान होणार आहे. या राज्यात 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च या दोन टप्प्यात मतदान होईल. 15 जानेवारीपर्यंत कोणत्याही सभा, पदयात्रा, सायकल यात्रा घेता येणार नाहीत. याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी सांगितले.

Advertisement

यूपी निवडणूक : भाजपला धक्का.. महिन्याभरात इतक्या बड्या नेत्यांनी सोडला पक्ष

Advertisement
Advertisement

Leave a Reply