बाब्बो.. ‘ऑनलाइन सेक्स रिंग’मध्ये हायप्रोफाईलही..! पहा कुठे सुरू आहे असा खेळ..!
तिरुअनंतपुरम : केरळमध्ये उघड झालेल्या पत्नीच्या अदलाबदलीच्या घृणास्पद आणि लज्जास्पद खेळाच्या खुलाशांनी आणखी नवीन सत्ये समोर येऊ लागली आहेत. यामुळे केरळ ढवळून निघाले आहे. सहा आरोपींना अटक करून त्यांच्या कारवायांच्या तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. राज्यातील अनेक हायप्रोफाईल लोकही याच्याशी संबंधित असल्याचा संशय आहे. केरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ‘ऑनलाइन सेक्स रिंग’शी 1000 हून अधिक लोक जोडले गेले होते. लैंगिक शोषणाच्या या व्यवसायात पैशाचे व्यवहार होण्याचीही शक्यता आहे. या टोळीचा केरळ पोलिसांनी ९ जानेवारी रोजी पर्दाफाश केला होता. (Kerala wife swapping cases 1000 people surrounded by online sex ring revelations stirred-up)
वास्तविक, पीडित महिलेने तिच्याच पतीविरुद्ध केलेल्या तक्रारीवरून हे प्रकरण उघडकीस आले. पीडितेने आरोप केला आहे की तिचा पतीच तिला ‘ग्रुप सेक्स’साठी भाग पाडत होता आणि गेल्या साडेतीन वर्षांपासून तो अशा प्रकारे पैसे कमवत होता. केरळचे डीजीपी अनिल कांत स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या या ‘देहव्यापाराचा’ तपास करण्याचे निर्देश त्यांनी अधिनस्थ अधिकाऱ्यांना दिले असून, यात कुणाचीही गय केली जाऊ नये असे स्पष्ट आदेश आहेत. ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विविध गट तयार करून हा अनैतिक आणि लज्जास्पद व्यवसाय चालवला जात होता, त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचाही पोलिसांचा सायबर सेल तपास करत आहे.
या प्रकरणातील पहिली तक्रार 8 जानेवारी रोजी कोट्टायम जिल्ह्यातील करुकाचल येथील एका 27 वर्षीय महिलेने केली होती. त्यांनी नऊ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांची नावे आणि फोन नंबरही दिले आहेत. पतीच्या संमतीने या पुरुषांनी पत्नी बदलण्याच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे. यानंतर आतापर्यंत नऊपैकी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सेक्स सिंडिकेटशी अनेक हायप्रोफाईल लोकांचाही संबंध असल्याचा संशय आहे. यामध्ये अनेक व्यापारी, अनिवासी, सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे कॉल डिटेल्स आणि सोशल मीडिया अॅपद्वारे झालेले संभाषण काढले जात आहे. पीडितेचे म्हणणे आहे की, तिचा नवरा अनेक सोशल मीडिया साइट्सवर सक्रिय असायचा आणि या गेममध्ये सामील झालेल्यांना आमंत्रित करायचा. सोशल मीडियावर या टोळीच्या नावाने ‘मीट अप केरळ’, ‘कपल मीट’, ‘रिअल मीट’ असे ग्रुप बनवून हा धंदा केला जात होता. त्यात सामील होण्यास इच्छुक असलेल्यांनी त्यांचे फोटो आणि स्थान तपशील या सोशल मीडिया ग्रुप्सवर शेअर केले. यामध्ये त्यांना त्यांची निवडही सांगण्यास सांगितले होते. त्यांची गोपनीयता कायम राहिली, म्हणून ते टेलिग्राम आणि इंस्टाग्रामसारख्या अॅप्सद्वारे ऑपरेट केले जात होते.
- मकर संक्रांत स्पेशल : घरीच तयार कार मूग डाळीची मसाला खिचडी; ही आहे रेसिपी..
- वाटाण्यापासून तयार करा ‘या’ टेस्टी डिश.. जाणून घ्या, काय आहे रेसिपी..
- नव्या वर्षात नाश्त्यासाठी तयार करा स्पेशल इंदोरी पोहे.. ही आहे अगदी सोपी रेसिपी..