Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IPLचा सर्वात महागडा खेळाडू अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, आता होणार या संघाचा कोच

मुंबई – दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू ख्रिस मॉरिसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ( international cricket) निवृत्तीची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी त्याने 69 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. सोशल मीडियाद्वारे त्याने ही बातमी जाहीर केली.(IPL’s most expensive player abruptly retires from international cricket, will now be the team’s coach)

Advertisement

त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा फोटो पोस्ट करत त्याने लिहिले, ‘आज मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे! माझ्या प्रवासात ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्या प्रत्येकाचे आभार, मग तो मोठा असो किंवा छोटा… हा एक मजेदार प्रवास होता!’ याशिवाय त्याने आपल्या भविष्याविषयीही सांगितले आहे. खरे तर क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो आता टायटन्स क्रिकेटमध्ये प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Loading...
Advertisement

देशातील प्रतिष्ठित स्पर्धा आयपीएलमध्येही मॉरिसने भाग घेतला आहे. त्याला राजस्थान रॉयल्सच्या संघाने 2021 मध्ये विक्रमी 16 कोटी 25 लाख रुपयांना विकत घेतले होते. मॉरिसच्या आधी आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू होण्याचा विक्रम भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू युवराज सिंगच्या नावावर होता.

Advertisement

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने आफ्रिकन संघासाठी चार कसोटी क्रिकेट सामने खेळताना 2 विकेट्स घेतले आहे. याशिवाय, त्याने आपल्या संघासाठी एकदिवसीय स्वरूपात 42 सामने खेळले आहे आणि T20 क्रिकेटमध्ये 23 सामने खेळले आहे. (IPL’s most expensive player abruptly retires from international cricket, will now be the team’s coach)

Advertisement
Advertisement

Leave a Reply