दिल्ली : उत्तराखंडमधील उधम सिंह नगर येथे एका कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणाचे प्रकरण समोर आले आहे. उधम सिंह नगरच्या काशीपूरमध्ये एक व्यक्ती चाकू घेऊन रावत यांच्या स्टेजवर पोहोचला. यावेळी उपस्थित कार्यकर्ते व नेत्यांमध्ये घबराट निर्माण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घटनेबाबत देशभरात चर्चा सुरू असताना असाच गंभीर प्रकार पुढे आल्याने प्रशासकीय अधिकारी व सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
कार्यकर्त्यांनी त्वरीत त्या व्यक्तीला पकडले आणि त्याच्याकडून चाकू हिसकावून घेतला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. उधम सिंग नगरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) दिलीप सिंग कुंवर यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान चाकू फिरवल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री हरीश रावतही उपस्थित होते. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.
Uttarakhand | A case registered against a man for allegedly brandishing a knife during an event organized by the Congress party in Udham Singh Nagar. Former CM Harish Rawat was also present at the event: Udham Singh Nagar Senior Superintendent of Police (SSP) Dilip Singh Kunwar
Advertisement— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 7, 2022
Advertisement