Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. तर ‘त्यांना’ मिळेल 300 युनिट मोफत वीज पुरवठा; पहा, कुणी केलीय ‘ही’ भन्नाट घोषणा..

नवी दिल्ली : देशाच्या कानाकोपऱ्यात रोज कुठे ना कुठे निवडणुका सुरू असतात. आताही या वर्षात काही राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याचा समावेश आहे. निवडणुका जवळ आल्याने राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी आणि विरोधकात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच मतदारांवर आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहे. येथे सत्ताधारी आणि विरोधी पक्षात विजेच्या मुद्द्यावर जोरदार राजकारण सुरू आहे.

Advertisement

सत्ताधारी भाजप सरकारने राज्यातील लहान गावापासून ते मोठ्या शहरापर्यंत 24 तास विज पुरवठा करण्याची घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षांनीही जोरदार घोषणा केली आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी घोषणा केली, की जर उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचे सरकार आले तर राज्यात 300 युनिटपर्यंत घरगुती वीज पुरवठा मोफत केला जाईल. तसेच शेतकऱ्यांनाही सिंचन सुविधा मोफत देण्यात येईल. यादव यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ही घोषणा केली आहे.

Advertisement

दरम्यान, या राज्यात विरोधक आणि सत्ताधारी पक्ष दोघांनीही आश्वासनांचा नुसता पाऊस पाडला आहे. विरोधक राज्य सरकारवर आरोप करत आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकारने योजनांचा धडाका लावला आहे. राज्यातील नागरिकांना दुप्पट रेशन तेही मोफत देण्यास सुरुवात केली आहे. युवकांना स्मार्टफोन आणि टॅबही मोफत दिले आहेत. त्यानंतर आता राज्य सरकारनेही आणखी मोठे आश्वासन दिले आहे. ते म्हणजे राज्यात 24 तास वीज पुरवठा देण्याचे. राज्य सरकार गावापासून ते शहरांपर्यंत 24 तास वीज पुरवठा देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Loading...
Advertisement

राज्यातील लहान गावापासून ते मोठ्या शहरांपर्यंत 24 तास वीज पुरवठा केला जाणार आहे. तसे पाहिले तर निवडणुकीच्या आधी सरकारने हा एक मोठा राजकीय डाव टाकला आहे. राज्याचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी सांगितले, की यासाठी पॉवर कॉर्पोरेशनला 1 हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

Advertisement

निवडणुकीच्या दृष्टीनेच सरकारने या काही घोषणा केल्या आहेत. सरकारने केलेल्या घोषणा जर प्रत्यक्षात आल्या तर याचा फायदा मिळणार आहे. सरकारच्या या चाली विरोधकांच्याही लक्षात येत आहेत. त्यामुळेच तर विरोधी पक्ष सुद्धा अनेक घोषणा करत आहेत. तसेच राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका सुद्धा करत आहेत.

Advertisement

अरे वा.. 24 तास मिळणार वीज पुरवठा; पहा, कुणी केलीय ‘ही’ घोषणा; जाणून घ्या, डिटेल

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply