Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

विराट-रोहितला धक्का..! म्हणून आयसीसीने केलेय दुर्लक्ष; ‘त्या’ यादीत फक्त एकच भारतीय खेळाडूचा समावेश

नवी दिल्ली : टी 20 विश्वकप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली याला आणखी एक झटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी 20 क्रिकेटमधील फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीत केवळ एकाच भारतीय खेळाडूला टॉप 10 मध्ये टिकता आले आहे. आयसीसीच्या क्रमवारीत के. एल. राहुल 5 व्या क्रमांकावर राहिला आहे.

Advertisement

या यादीत पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली मात्र टॉप 10 मध्ये नाही. या यादीत विराट 11 व्या क्रमांकावर आहे. डेव्हीड मलान दुसऱ्या तर दक्षिण आफ्रिकेचा मार्करम तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, आयसीसीच्या टी 20 गोलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत टॉप 10 क्रमवारीत एकही भारतीय खेळाडू नाही. टी 20 क्रिकेटमधील क्रिकेट संघांच्या क्रमवारीत मात्र भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Advertisement

टी 20 विश्वकप स्पर्धेत विराट कोहलीची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली. पहिल्याच फेरीत भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले. विशेष म्हणजे, पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातही पराभव पत्करावा लागला. त्यानंतर आता आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीतही भारतीय खेळाडूंना जोरदार झटका बसला आहे. या यादीत के. एल. राहुल वगळता एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. रोहित शर्माने चांगली कामगिरी केली आहे. मात्र तरीसुद्धा या यादीत त्याचा विचार केल्याचे दिसत नाही. या यादीत रोहित शर्मा थेट 13 व्या क्रमांकावर गेला आहे. पहिल्या दहा फलंदाजांच्या यादीत रोहित शर्माचा विचार केलेला नाही.

Loading...
Advertisement

यंदा ‘टी 20’ मध्ये घडतोय अजब योगायोग; ‘त्या’ संघांच्या यशात ‘हा’ फॅक्टर ठरतोय कारणीभूत

Advertisement

रोहित-विराट-अजिंक्यला काय म्हणाले, माजी प्रशिक्षक रवी शास्त्री.. जाणून घ्या

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply