Take a fresh look at your lifestyle.

आणि म्हणून ताजमहालच झालाय ‘गायब’..! पहा नेमके काय आहे कारण

दिल्ली : दिवाळीच्या एका दिवसानंतर शुक्रवारी उत्तर प्रदेशातील प्रमुख शहरांमधील वायू प्रदूषणाची पातळी ‘गंभीर’ झाली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सर्वाधिक 22 वायू प्रदूषित शहरांपैकी 10 शहरे यूपीमधील आहेत. यावेळी येथे ना फटाक्यांची बाजारपेठ होती.. ना दुकानात फटाके विकण्यास परवानगी होती, असे असतानाही लोकांनी जोरदार फटाके पेटवले गेले आहेत. परिणामी शुक्रवारी अनेक लोकांना घरात कोंडून घेऊन बसावे लागले. प्रदूषणामुळे धुक्याची चादर पसरल्याने सर्वत्र धुके पसरले होते. विचित्र वास आणि श्वासोच्छवासात लोकांना अस्वस्थ वाटू लागले आहे. विशेषत: जे लोक अस्थमाचे रुग्ण आहेत किंवा भूतकाळातील कोरोना विषाणूमुळे त्यांची फुफ्फुसे अजूनही नीट काम करत नाहीत त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Advertisement

आग्रा शहरामधील प्रदूषणाची पातळी इतकी जास्त झाली होती की ताजमहाल धुक्याच्या दाट चादरीने झाकलेला होता. ज्यामुळे तो 100 मीटर अंतरावरुनही दिसत नव्हता. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) द्वारे निरीक्षण अनुसार आग्रा येथील AQI शुक्रवारी सकाळी 10 वाजता 419 आणि दुपारी 2 वाजता 432 या निर्देशांकाला स्पर्श करून गंभीर या श्रेणीत नोंदवले गेले. गेल्या वर्षी दिवाळीच्या आदल्या दिवशी आगराचा AQI 347 (अत्यंत खराब) नोंदवला गेला. आग्रा येथे नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून हवेची गुणवत्ता ‘अत्यंत खराब’ आणि ‘खराब’ आहे. AQI पातळी 327 (1 नोव्हेंबर), 300 (2 नोव्हेंबर), 289 (3 नोव्हेंबर) आणि 280 (नोव्हेंबर 4) आहे. मुख्यतः फटाक्यांमुळे शुक्रवारी AQI आदल्या दिवसाच्या तुलनेत सुमारे 150 अंशांनी जास्त नोंदवला गेला आहे.

Advertisement

यावेळी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये दिवाळीनिमित्त फटाक्यांवर बंदी घालण्यात आली होती. असे असतानाही दिवाळीच्या रात्री उशिरापर्यंत शहरात अनेकांनी फटाके फोडले. आकाशात प्रदूषणाची चादर पसरली होती. दिवसभरातील या प्रदूषणामुळे सूर्याचा पूर्ण प्रकाश जमिनीपर्यंत पोहोचू शकला नाही. परिणामी, गाझियाबादमध्ये वायू प्रदूषण पातळी (AQI) 470 च्या चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी दिवाळीत प्रदूषणाची पातळी ४४८ पेक्षा जास्त होती. नोयडा आणि कानपूर भागातही अशीच गंभीर परिस्थिती पाहायला मिळत आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply