Take a fresh look at your lifestyle.

आणि अशोक चव्हाणांनी पहाटेच केले ‘क्लास’ काम; पहा काय म्हणतायेत शेतकरी

नांदेड : सरकारी अधिकारी आणि कर्मचारी हे कर्तव्य कमी आणि अडवणूक जास्त अशा धोरणाने काम करतात. अनेकदा असा प्रत्यय येऊन आणि त्यावर तक्रारी येऊनही प्रशासनात काहीच फरक पडलेला नाही. अशावेळी समाजाला कितीही नकारात्मक वाटत असले तरी राजकारणी मंडळी किमान कामाला येतात. त्याचाच प्रत्यय मंत्री अशोक चव्हाण यांच्या एका अनुभवाने शेतकऱ्यांना आला आहे. क्लास कंपनीच्या सोयाबीन मशीन घेऊन येताना आरटीओ साहेबांनी केलेल्या अडवणुकीचा हा किस्सा आहे.

Advertisement

याबाबतची माहिती देणारी पोस्ट नांदेड येथील बालाजी हेंद्रे यांनी फेसबुकवर शेअर केली आहे. त्यांनी म्हटलेय की, सोयाबीनचे हालर (सोन्गणी) करायला आधीच मशीन भेटत नाहीत. रोज पाऊस पडत आहे. म्हणून मी कर्नाटक राज्यातून सोयाबीन मशीन बोलवल्या. मशीन येणार आहेत म्हणून मी रात्रभर नांदेडमध्येच होतो. वाट पाहत सकाळी सकाळी 4 वाजता नांदेडमध्ये मशीन दाखल झाल्या. मला फोन आला मशीन RTO नांदेड यांनी ओपीसमध्ये लावल्या आहेत. मी लगेच सकाळी 5 वाजता तिथं दाखल झालो. RTO साहेबांना विनंती केली की, साहेब, आमचे सोयाबीन आधीच पावसाने खराब होत आहे. आम्हला जाऊ द्या.

Advertisement

https://www.facebook.com/balajihendre.patil

Advertisement

पण RTO काहीच बोलायला तयार नव्हता. तर इकडे देळूबचे शेतकरी मला फोनवर फोन करत होते. कधी येणार मशीन म्हणून. मग मी भीतभीत मंत्री. अशोकराव चव्हाण साहेब ह्यांना फोन लावला. सकाळी 5 वाजले असतील. साहेबांना सगळी हाकीकत सांगितली. साहेबांनी तितक्या सकाळी एका बेलवर फोन उचलला आणि RT0 नांदेड ह्यांना गाड्या सोडून देण्याचा आदेश दिला. तसेच ह्यांना अर्धापुरपर्यत नेऊन सोडण्याचेही त्यांनी सांगितले. तसं तर मी भाजपचा कार्यकर्ता. पण साहेबांनी सकाळी 5 वाजता फोन उचलून मदत केली. मी एक शेतकरी म्हणून माझे काम केले. आदरणीय चव्हाण साहेब आपले खूप खूप आभार व समस्त देळूब गावातील शेतकऱ्याच्या वतीने आपले आभार व धन्यवाद, असेही हेंद्रे यांनी पुढे म्हटले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply