Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ संकटावर मात करण्यासाठी सरकारने केलाय ‘असा’ प्लान; पहा, लोकांचे आरोग्य ‘कसे’ सुधारणार ?

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली शहरात वायू प्रदूषणाची समस्या अतिशय गंभीर बनली आहे. दिल्लीच नाही तर देशातील अनेक मोठ्या शहरात प्रदूषणाने माणसांचे आरोग्य धोक्यात आणले आहे. या संकटाची जाणीव असल्याने प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. दिल्ली सरकारने यासाठी खास प्लान तयार केला आहे. या प्लानच्या मदतीने शहरातील प्रदूषण नाहीसे करू, असा विश्वास सरकारला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत घोषणा केली आहे.

Advertisement

धुळीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी 75 पथके तयार केली आहेत. शहरात कोणत्या कारणांमुळे प्रदूषण वाढत आहे, याची माहिती घेण्यासाठीही विशेष पथके नियुक्त केली आहेत. वाहतूक कोंडीमुळे सुद्धा प्रदूषण वाढण्यास मदत होते. त्यामुळे ज्या ठिकाणी ही समस्या जास्त आहे तेथे लक्ष केंद्रीत करुन वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. शहरात कचरा जाळणे पूर्णपणे बंद करण्याचे नियोजन आहे. या नियमाचे पालन करण्यासाठी 250 पथके नियुक्त केली आहेत.

Advertisement

डिझेल जनरेटचा वापर कसा कमी करता येईल, याचा विचार सुरू आहे. दिवसभर जर वीज पुरवठा उपलब्ध केला तर शक्यतो डिझेल जनरेटरचा वापर कुणी करणार नाही. यामुळे सुद्धा प्रदूषण कमी होण्यास मदत मिळेल. या पद्धतीने दिल्ली सरकार नियोजन करत आहे. सध्या शहरातील प्रदूषण नियंत्रणात आहे. मात्र, शेजारील राज्यांमुळे शहरात वायू प्रदूषणाची समस्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र आणि संबंधित राज्य सरकार या समस्येवर मात करण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाहीत, अशी टीका केजरीवाल यांनी केली.

Advertisement

दरम्यान, सध्या देशातील अनेक लहान-मोठ्या शहरात प्रदूषणाची समस्या गंभीर बनत आहे. वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. तसेच औद्योगिकीकरणाचाही प्रदूषण वाढण्यात मोठा वाटा आहे. या समस्येवर मात करण्यासाठी प्रयत्न होत नाहीत, असेही नाही. प्रयत्न होतात मात्र त्यामध्ये सातत्य नसते. प्रभावी अंमलबजावणी होत नाही. निर्णयांची अंमलबजावणी न होण्यामागेही अनेक कारणे आहेत.  आताही दिल्ली सरकारने प्रदूषण कमी करण्यासाठी प्लान तयार केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी होणार का, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

 

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply