पुणे : सध्या अवघ्या भारताला नवरात्र तर, महाराष्ट्र राज्याला दसरा आणि तत्पूर्वी येणाऱ्या घटस्थापना या सणाचे वेध लागले आहेत. त्यासाठी आपले घरदार स्वच्छ आणि सुंदर करण्याची जुनी परंपरा आहे. ही परंपरा म्हणजे पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण क्षेत्रात मोठा महोत्सव बनली आहे.
सध्या गोधड्या धुणे आणि त्या वळत टाकल्या जाण्याचे चित्र सगळीकडे पाहायला मिळते. त्यामुळे रंगबिरंगी गोधड्या वाळत टाकलेल्या पाहून निसर्गाच्या कुशीत वेगळ्याच रंगछटा उमटत असतात. तसाच प्रकार सध्या खडकवासला धरण आणि नदीच्या किनाऱ्यावर पाहायला मिळत आहे. रोज हजारो महिला व कुटुंबवत्सल पुरुष या भागात हजारो गोधड्या धुवून वाळत टाकत आहेत. त्याची चर्चाही आता सोशल मीडियामध्ये कौतुकाने होत आहे. महेश पोकळे यांनी ट्विटरवर याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
*खडकवासला धरण , गोधडी धुवा महोत्सव 😅 pic.twitter.com/89nZaoBSn8
Advertisement— Mahesh R Pokale (@pokalemahesh) October 4, 2021
Advertisement