राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पाऊस; पहा, काय आहे हवामान विभागाचा अंदाज
मुंबई : हवामान विभागाने राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात पुढील 4 ते 5 दिवसात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने पावसाचा इशारा जारी केला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात आजपासून अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. आज नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान आहे.
राज्यात यंदा जास्त पाऊस पडला आहे. गुलाब या चक्रीवादळामुळे अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर जास्त आहे. अजूनही काही ठिकाणी पाऊस होत आहे. आता हवामान विभागाने आणखी 4 ते 5 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचा मुक्काम आणखी वाढला आहे.
दरम्यान, राज्यात आज काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. हिंगोली जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. दोन दिवस पाऊस नव्हता. आज मात्र पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे.
. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.