Take a fresh look at your lifestyle.

राज्यात पुढील दोन दिवस पावसाचे..! पहा, कोणत्या जिल्ह्यात पाऊस बरसणार; हवामान विभागाचा काय आहे अंदाज

पुणे : राज्यात काही ठिकाणी पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुलाब चक्री वादळामुळे अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. कालही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. त्यानंतर आता हवामान विभागाने पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. काल सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

Advertisement

कोकण आणि मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी जोरदार, तर बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर विदर्भात काही ठिकाणी पावसाचा जोर राहील, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. आज परभणी, बीड, लातूर, नांदेड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. रविवारी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी तर सोमवारी औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने सांगितले.

Advertisement

राज्यात सध्या अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे येथे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांनाही फटका बसला आहे. पावसाचा जोर अजूनही कायम आहे. या व्यतिरिक्त कोकण, विदर्भ आणि अन्य जिल्ह्यांतही पाऊस होत आहे. काल सायंकाळनंतर नगर शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. तसेच आजही ढगाळ हवामान आहे. सध्या पाऊस थांबला असला आहे. मात्र, पावसाचे वातावरण अनेक ठिकाणी आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply