Take a fresh look at your lifestyle.

अर्र… मोदी लाटेवर भाजप नेत्यांनाच नाही भरवसा; पहा, ‘या’ भाजप नेत्याने नेमके काय म्हटलेय

बंगळुरू : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या बळावर सत्ताधारी भाजपने अनेक निवडणुका जिंकल्या. देशात अजूनही मोदी लाट आहे. आणि याच लाटेच्या भरवशावर भाजपने पुन्हा निवडणुका जिंकण्याची तयारी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्याच्या निवडणुकीत मात्र मोदी लाट कितपत यशस्वी होईल, याबाबत आता खुद्द भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनाच शाश्वती राहिल्याचे दिसत नाही. कारण, नुकतेच कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेले भाजप नेते बी. एस. येदियुरप्पा यांनी असेच एक खळबळजनक विधान केले आहे.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव वापरुन निवडणुका जिंकता येणार नाहीत. लोकसभा निवडणूक जिंकणे सोपे आहे. मात्र, राज्यात निवडणूक जिंकणे कठीण आहे. केवळ मोदी लाटेच्या बळावर कर्नाटकमध्ये निवडणुका जिंकता येणार नाहीत, असे येदियुरप्पा यांनी म्हटले आहे. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी हे मत व्यक्त केले. त्यांच्या या विधानावर राजकीय विश्वात मात्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकी नंतरही देशात भाजप हाच सत्तेत राहिल, यात आजिबात शंका नाही. पण प्रत्येक निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी आपण पक्षाला मजबूत करायला हवे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Advertisement

दरम्यान, केंद्रातील सत्ताधारी भाजपने नुकतेच काही राज्यातील मुख्यमंत्र्यांचे राजीनामे घेतले आहेत. यामध्ये कर्नाटकचाही समावेश आहे. माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. याच प्रमाणे गुजरात, उत्तराखंड राज्यातील मुख्यमंत्री भाजपने बदलले आहेत. या राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्याआधीच भाजपने या राज्यात नवे मुख्यमंत्री दिले आहेत. या राज्यातील बदललेल्या राजकारणाचा अंदाज घेऊन भाजप नेतृत्वाने असा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply