Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र… मोफत धान्य वितरण बंद तरीही मिळणार मोफत धान्य; पहा, कोणत्या राज्यात घडतोय ‘हा’ प्रकार

लखनऊ : कोरोना संकट काळात केंद्र सरकारने देशातील गरीबांना मोफत धान्य देण्यास सुरुवात केली. देशातील अनेक राज्यांनीही तशी योजना सुरू केली. त्यामुळे नागरिकांना दोन वेळेस मोफत धान्य मिळत होते. आता मात्र उत्तर प्रदेश सरकारने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नागरिकांना महिन्यातून एकदाच मोफत धान्य मिळणार आहे. एक वेळचे मोफत धान्य मिळणे बंद होणार आहे. केंद्र सरकारकडूनच आता मोफत धान्य मिळणार आहे. राज्य सरकारने या महिन्यापासून मोफत धान्य योजना बंद केली आहे.

Advertisement

याआधी 5 ते 15 सप्टेंबर दरम्यान मोफत धान्य देण्यात आले. 20 सप्टेंबरपासून नेहमी प्रमाणे धान्य वितरण सुरू होणार आहे. मात्र, यासाठी नागरिकांना काही पैसे द्यावे लागणार आहेत. गहू 2 रुपये प्रति किलो आणि तांदूळ 3 रुपये प्रति किलो या दराने पैसे द्यावे लागणार आहे. नव्या बदलानुसार आता महिन्यातून एकाच वेळेस मोफत धान्य मिळणार आहे. मात्र, दुसऱ्या वेळेस धान्य हवे असेल तर नेहमीप्रमाणे पैसे देऊन खरेदी करावे लागणार आहे.

Advertisement

कोरोना लॉकडाऊन काळात मागील वर्षात केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्य देण्यास सुरुवात केली. नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य दिले जाणार आहे. या योजनेंतर्गत लोकांना 2 किलो गहू आणि तीन किलो तांदूळ देण्यात येतात. त्यानंतर या वर्षात उत्तर प्रदेश सरकारनेही मोफत धान्य योजना सुरू केली होती. सरकारने ऑगस्ट पर्यंत धान्य दिले. तीन महिन्यांपर्यंतच धान्य देण्यात येणार होते. आता ही मुदत संपली आहे. त्यामुळे या योजनेस मुदतवाढ देण्याचा विचार सरकारने टाळला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने आता मोफत धान्य योजना बंद केली आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, या राज्यात पुढील वर्षात निवडणुका होणार आहेत. निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन निर्णय होत आहेत. मात्र, नेमक्या याच वेळी सरकारने असा निर्णय घेतला आहे. या मुद्द्यावर विरोधी पक्ष सरकारला घेरण्याचा प्रयत्न निश्चित करतील. त्याचा परिणाम काय होईल, हे मात्र निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply