Take a fresh look at your lifestyle.

राज्यात मोठी राजकीय उलथापालथ….चंद्रकांत पाटील यांनी दिलाय सूचक इशारा….वाचा नेमकं काय म्हणाले…

भाजपाच्या 105 जागा निवडून येऊनही राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी राजकीय खेळी करत राज्यात महाविकास आघाडीची निर्मीती करून सत्तेचा लंबक आपल्याकडे खेचला.

पुणे : महाविकास आघाडी आणि भाजपात सातत्याने चांगलाच कलगितुरा रंगलेला असतो. निवडणूकीआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणावर भाजपात पक्षांतर झाले. मात्र त्यानंतर भाजपाच्या 105 जागा निवडून येऊनही राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी राजकीय खेळी करत राज्यात महाविकास आघाडीची निर्मीती करून सत्तेचा लंबक आपल्याकडे खेचला. त्यानंतर भाजपाच्या वतीने ऑपरेशन लॉटससाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू केले. मात्र आता राज्यात राज्यात मोठी खळबळ माजणार असल्याचं विधान करून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चर्चेला तोंड पाडले आहे.

Advertisement

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून सातत्याने राज्यातील सरकार पडणार असल्याची वल्गना भाजपाकडून केली जात आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, आम्ही सरकार पाडणार नाही, पण सरकार अस्थिरतेमुळे पडलेच तर आम्ही राज्याला पर्यायी सरकार देऊ. तर केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांंनीही जन आशिर्वाद यात्रेदरम्यान म्हटले होते की, महाराष्ट्र उध्वस्त करायला निघालेल्यांना सांगू इच्छितो. तुमचा काळ संपलाय. राज्यात भाजपाचे सरकार येणार आहे. तर आतापर्यंत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील यांनी अनेक वेळा भाजपाची सत्ता येणार असल्याचे म्हटले होते.

Advertisement

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देहू येथे कार्यक्रमाला आले असतांना म्हटले की, माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसात कळेल, असं सूचक विधान करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. तर चंद्रकांत पाटील यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मात्र आतापर्यंत चंद्रकांत पाटील यांनी अशा प्रकारचे वक्तव्य अनेक वेळा केले आहे. त्यामुळे आज केलेलं विधान गमतीने केलं की खरंच राज्याच्या राजकारणात उलथापालथ होणार हे येत्या दोन तीन दिवसात कळेल.

Advertisement
Advertisement

Leave a Reply