मुंबई : विजय रूपांनी यांनी गेल्या शनिवारी मुख्यमंत्रिपदावरून अचानक राजीनामा दिल्यानंतर आणि भूपेंद्र पटेल यांना नवे मुख्यमंत्री बनवल्यानंतर भाजपमध्ये उडालेली खळबळ अजूनही शमली नाही. आतापर्यंत केवळ भूपेंद्र पटेल यांनी सोमवारी शपथ घेतली असून नवीन मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळ बुधवारी शपथ घेणार होते पण ते पुढे ढकलण्याची नामुष्की गुजरात भाजपवर ओढवली आहे.
गुजरातमध्ये शपथविधीसाठी लावलेले बॅनर फाडण्यात आले आता बुधवारी न झालेला शपथ ग्रहण गुरुवारी दुपारी 1.30 वाजता होईल, असे पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना पदावरून हटवून कुठलेतरी राज्यपाल बनवले जाऊ शकते, या बातमीने या राज्यात भाजपला झटका दिला आहे. परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे गृहराज्य असेल्या या राज्यात प्रथमच मागील १५ वर्षात असे चित्र पाहायला मिळाले आहे. गुजरात भाजपचे प्रवक्ते यमल व्यास यांनी सांगितले होते की, नवीन मंत्र्यांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. हे मंत्री राजधानी गांधीनगरमध्ये दुपारी 2 नंतर शपथ घेतील. येथे पोस्टर बॅनर लावण्यात आले होते. शपथविधीची तयारी झाली पण वाद निर्माण झाला. पोस्टर-बॅनर फाडण्यात आले, असे नवभारत टाईम्स यांच्या बातमीत म्हटलेले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या गुजरात युनिटचे प्रमुख भूपेंद्र यादव नवीन मंत्रिमंडळात लोकांची नावे समाविष्ट करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून गांधीनगरमध्ये वारंवार बैठका घेत आहेत. अशी अटकळ आहे की पटेल आपल्या मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश करतील आणि अनेक जुन्या नेत्यांना तरुण नेत्यांसाठी जागा मोकळी करावी लागेल. यासंदर्भात येथे वाद सुरू झाला आहे. अशा स्थितीत जेव्हा डिसेंबर 2022 मध्ये राज्याच्या विधानसभा निवडणुका होणे अपेक्षित आहे, तेव्हा भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी पटेल या पाटीदार समाजाच्या नेत्यांवर विश्वास ठेवला आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विधानसभेच्या 182 पैकी 99 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या.
- म..रे.. ‘मार्केटिंग’चा : वाचा रिब्रँडिंगच्या ट्रिक्स आणि त्यासाठी आवश्यक स्किल्सची माहिती
- मोदी सरकारने घेतलाय मोठा निर्णय… सिम कार्ड घेणं झालं सोपं…वाचा कसं…