…म्हणून ओबीसी आरक्षण धोक्यात आलं…वाचा नेमकं काय म्हणाले नाना पटोले
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूका पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य सरकारचा नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा भाजपा विरूध्द महाविकास आघाडीत वाक्-युध्द रंगले आहे.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामंधील ओबीसी आरक्षण रद्दबातल ठरवल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपांना सुरूवात झाली. ओबीसींचे आरक्षण रद्द होण्यास राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारची उदासिनता कारणीभुत असल्याची टिका भाजपाने केली आहे. तर महाविकास आघाडीतर्फे ओबीसी आरक्षण रद्द होण्यासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याची टिका केली जात आहे.
सध्या सर्वोच्च न्यायालयाने निवडणूका पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य सरकारचा नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा भाजपा विरूध्द महाविकास आघाडीत वाक्-युध्द रंगले आहे. त्यातच राज्य सरकारच्या उदासिनतेमुळे ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द झाले आहे. तसेच राज्यातील पाच जिल्हा परिषदा आणि 33 पंचायत समिती निवडणूकांच्या कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तर इम्पिरीकल डेटा गोंधळात अडकल्याने राज्यात चांगलेच राजकारण तापले आहे.
यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका करताना म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांंनी ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असणारा इम्पिरिकल डेचा उपलब्ध करून दिला नाही. तसेच राज्यातील भाजपाने ओबीसींचे आरक्षण संपवण्याचं काम केलं, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
नाना पटोले यांनी ट्वीटरवर आपली भुमिका मांडतांना राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. तर केंद्रातील मोदी सरकारने जनगणनेची आकडेवारी उपलब्ध करून न दिल्याने आणि तात्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिपत्रक काढून जिल्हा परिषद निवडणूका पुढे ढकलण्याचे काम केले. त्यामुळे फक्त राज्यातीलच नाही तर संपुर्ण देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले, असा आरोप पटोले यांनी केला तर भाजपा नेत्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात आंदोलन करावे, असा खोचक सल्ला दिला. तर राज्यातील ओबीसी नेत्यांनी आरक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.
केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी न दिल्याने व तत्कालीन मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी परिपत्रक काढून जि.प. निवडणुका पुढे ढकलल्याने फक्त राज्य नाही तर देशातील OBC चे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे
त्यामुळे भाजप नेत्यांनी @narendramodi यांच्या विरोधात आंदोलन करावे.Advertisement— Nana Patole (@NANA_PATOLE) September 15, 2021
Advertisement