Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

डॉ. कलामांच्या नावाने फिरणारा ‘तो’ मेसेज फेक…वाचा काय आहे प्रकरण…

भारताचे लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष डॉ. ए. पी. जे. कलाम यांच्या चित्रासह समाजमाध्यमावर एक मेसेज फिरत आहे. तो मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे.

Please wait..

दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याबद्दल भारतात विशेष प्रेम आणि आस्था आहे. तर युवक डॉ. कलामांना आपला प्रेरणास्रोत मानतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून डॉ. कलाम यांच्याविषयी एक फेक मेसेज समाजमाध्यमात फिरत आहे. तर तो मेसेज डॉ. कलाम यांचाच असल्याचा दावा केला जात आहे.

Advertisement

Advertisement

भारताचे लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष डॉ. ए. पी. जे. कलाम यांच्या चित्रासह समाजमाध्यमावर एक मेसेज फिरत आहे. तो मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. तर त्या मेसेजमध्ये लिहीले आहे की, मुसलमान जन्माने दहशतवादी नसतात. त्यांना मदरशांमध्ये कुराण शिकवले जाते. त्यानुसार ते हिंदू, बौध्द, शीख, ख्रिच्चन, ज्यू आणि इतर बिगर मुस्लिमांची निवडकपणे हत्या करतात. तसेच दहशतवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतात चालणाऱ्या मदरशांवर बंदी घालणे अत्यंत आवश्यक आहे, असा त्या मेसेजचा आशय आहे. 

Advertisement

या मेसेजबाबत अल्ट न्यूजने सत्य पडताळणी केली. त्यातून फिरणारा मेसेज खोटा असल्याचे सिध्द झाले आहे. तर यासंदर्भात खुलासा अल्ट न्यूज आणि वेबकुप (क्विंट) या  आघाडीच्या वृत्तसंस्थांनी केला आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

या मेसेजची पडताळणी करताना अल्ट न्यूजने सांगितले की, हा संदेश सोशल मीडियावर अनेक वर्षांपासून डॉ. कलाम यांच्याछायाचित्रासह शेअर केला जात आहे. तर 2 वर्षापुर्वी ते शेअर चॅटवर शेअर करण्यात आले आहे. तर अल्ट न्यूजने 2014 च्या ब्लॉग पोस्टमध्ये या विधानाचे संदर्भ सापडले आहेत. याबाबत अल्ट न्यूजने सांगितले की, हा ब्लॉग संजय तिवारी नावाचा व्यक्ती चालवतो. जो स्वतःला उजाला न्यूज नेटवर्कचा संस्थापक म्हणून मिरवत असतो. त्याचे ट्वीटर हँडल पाहिल्यानंतर तो व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समर्थक आहे. जो सातत्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरूध्द अपशब्द वापरत असतो.

Advertisement

त्यामुळे या विधानाशी संबंधीत बातम्यांचा शोध घेतला असता, अशा कोणत्याही बातम्या सापडल्या नाहीत. तसेच डॉ. कलाम अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य करणे अशक्य आहे. तसेच याबाबत प्रसारमाध्यमातही कोणते संदर्भ सापडले नाहीत. मात्र तरीही हे विधान कलाम यांच्या नावाने वर्षानुवर्षे इंटरनेटवर फिरत आहे.

Advertisement

Advertisement

या विधानाबाबत अल्ट न्यूजने (ALT News) ए.पी.जे.एम.जे.शेख सलीम यांना संपर्क केला आणि या फोटोबद्दल विचारले. तर डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी असे कोणतेही विधान केले नाही. त्यांनी कधीही कोणत्याही धर्माच्या संबंधीत अशी टिपण्णी केली नाही, असे सलीम यांनी सांगितले. सलीम हे डॉ. कलाम यांचे पुतणे आहेत. तसेच ते अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन (AKIF) चे व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply