अर्रर…भाजपाच्या ‘त्या’ मुख्यमंत्र्यांचा राजीनामा; वाचा नेमकं कारण
गेल्या वर्षभरात उत्तराखंड आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देत एक प्रकारचा धक्का दिला होता. निवडणूकीपुर्वीच उत्तराखंड आणि कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रीपदाची खांदेपालट झाली होती.
दिल्ली : गेल्या वर्षभरात उत्तराखंड आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देत एक प्रकारचा धक्का दिला होता. निवडणूकीपुर्वीच उत्तराखंड आणि कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रीपदाची खांदेपालट झाली होती. आता त्याच सिक्वेलमध्ये आणखी एक नाव सामील झालं आहे. त्यामुळे निवडणुकीपुर्वी मुख्यमंत्री बदलण्याच्या कहानीत थोडा ट्वीस्ट आला आहे.
उत्तराखंड आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर तेथे नव्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र गेल्याच महिन्यात मुख्यमंत्रीपदाची पाच वर्षे पुर्ण केलेल्या विजय रूपाणी यांनी आज अचानक मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे देशभर चर्चांना उधाण आले आहे.
2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गुजरातची कमान आनंदीबेन पटेल यांच्या हाती सोपवली. मात्र त्यांना विशेष काम न करता आल्याने निवडणूकीच्या आधी आनंदीबेन पटेल यांना हटवत विजय रूपाणी यांच्या गळ्यात 7 ऑगस्ट 2016 रोजी मुख्यमंत्रीपदाची माळ पडली होती. मात्र आज विजय रूपाणी यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे आपला राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर तो संपुर्ण मंत्रीमंडळाचा राजीनामा असतो. त्यामुळे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू झाली आहे. तर राजीनामा दिल्यानंतर रूपाणी म्हणाले की, आता पक्षाने दिलेली जबाबदारी मी पुर्ण करीन. तसेच लोकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल रूपाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. तर आता गुजरातचा विकास नव्या नेतृत्वाखाली झाला पाहिजे, असे मत रूपाणी यांनी व्यक्त केले.
रूपाणी यांच्या राजीनाम्यानंतर जनता विजय रूपाणी यांच्या नेतृत्वावर खुश नसल्याचे जनमत जाणून घेतल्यानंतर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. तसेच रूपाणी यांनी पक्षात फुट पाडल्याचा आरोपही आहे. कारण रूपाणी यांचे भाजप प्रदेशाध्यक्षांशी मतभेत समोर येत आहेत.