Take a fresh look at your lifestyle.

नाना पटोलेंनी थेट शरद पवारांनाच केलं टार्गेट…म्हणाले ज्यांना जमीनी राखायला दिल्या त्यांनीच….

काँग्रेसची अवस्था उत्तरप्रदेशातील जमीनदारांसारखी झाली आहे. त्यांच्याकडील जमीनी गेल्या आहेत आणि आता फक्त हवेल्या राहिल्या आहेत, असे वक्तव्य काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले होते.

मुंबई : राज्यात भाजपाकडून महाविकास आघाडीला गोत्यात आणण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आता महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येच चांगलीच जुंपल्याचे चित्र आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या नेत्याने थेट शरद पवार यांच्यावर बोचरी टिका केली आहे.

Advertisement

काँग्रेसची अवस्था उत्तरप्रदेशातील जमीनदारांसारखी झाली आहे. त्यांच्याकडील जमीनी गेल्या आहेत आणि आता फक्त हवेल्या राहिल्या आहेत, असे वक्तव्य काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले होते. त्यावर काँग्रेसकडून जोरदार प्रतिक्रीया व्यक्त करण्यात आली आहे.

Advertisement

पवार एका मुलाखतीत म्हणाले होते की, आज काँग्रेसची अवस्था उत्तरप्रदेशातील एखाद्या जमीनदारासारखी झाली आहे. जसा रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळं शिवार माझंच असल्याचे सांगतो. तशीच अवस्था आज काँग्रेसची झाली आहे.  मात्र तरीही काँग्रेस आजही रिलेव्हंस पक्ष आहे. जो देशभर पसरलेला आहे. काँग्रेसकडे लोकसभेत दीडशेच्या घरात जागा होत्या. त्यामुळेच तर युपीएचा प्रयोग झाला. परंतू आज काँग्रेसकडे केवळ चाळीस जागा आहेत.

Advertisement

मात्र शरद पवार यांच्या विधानाचा समाचार घेतांना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांंनी म्हटले की, काँग्रेसने अनेकांना जमीनी राखायला दिल्या. मात्र जमीन राखणारांनीच डल्ला मारला. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असं शरद पवारांना म्हणायचं असेल असा टोला लगावला.

Advertisement

पुढे बोलताना पटोले म्हणाले की, काँग्रेसने जमीनदारी केली नाही, उलट ज्यांना शक्ती दिली त्यांनीच काँग्रेसचा घात केला. तसेच सध्या काँग्रेस नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.

Advertisement
Advertisement

Leave a Reply