Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

तर ‘तो’ असेल पंकजा मुंडेंना मोठाच झटका? पहा फडणवीसांची खेळी काय असू शकते ती

नाशिक : सध्या महाराष्ट्र भाजपचे दिग्गज नेते थेट दिल्लीवारीवर आहेत. त्यामुळे आता या पक्षात नेतृत्वबदलाचे वारे जोमात असल्याची चर्चा आहे. नवीन प्रदेशाध्यक्ष निवडीवर सध्या दिल्लीत खलबते सुरू असून यानिमित्ताने पुन्हा एकदा माजी मंत्री पंकजा मुंडे यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

Advertisement

आता महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक असलेले जळगाव-जामोदरचे आमदार डॉ. संजय कुटे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे पक्षातील चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यासारख्या नेत्यांना डावलले गेल्याची भावना पुन्हा एकदा वाढीस लागण्याची चिन्हे आहेत.

Loading...
Advertisement

मागील चार टर्म आमदार असलेले कुटे हे जास्त प्रकाशझोतात न राहणारे नेते आहेत. मात्र, आता राज्यातील सध्याची एकूण परिस्थिती हाताळण्यासाठी पुन्हा एकवार ओबीसी नेतृत्व पुढे आणणे गरजेचे असल्याचे पक्षातील नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे विद्यमान प्रदेशाध्यक्ष व मराठा नेते चंद्रकांत पाटील यांना पायउतार केले जाऊन नव्याने कोणीतरी या पदावर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

पंकजा यांनी देवंेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जाहिर नाराजी व्यक्त केल्याने फडणवीस गट सध्या त्याचा वचपा काढण्याच्या प्रयत्नात आहे. ओबीसींना पक्षातून नवे नेतृत्व देऊन मुंडे यांना झटका देण्याची ही खेळी असल्याचे म्हटले जात आहे. पक्षात सध्या फ़क़्त ही चर्चा आहे. त्यामुळे फडणवीस यांची नेमकी काय खेळी आहे की या फ़क़्त वावड्या आहेत हे आता लवकरच स्पष्ट होईल.

Advertisement
Advertisement

Leave a Reply