Take a fresh look at your lifestyle.

ब्लॉग : ‘तसल्या’ राजकारणातला अपवाद म्हणजे फायरब्रँड नेते जितेंद्र आव्हाड..!

राजकारण म्हटले की तुम्हाला तुमच्या भूमिका आणि तुमचे व्यक्तिगत विचार हे तुमच्या मतदारानुसार बदलावे लागतात. मतपेटीतून व्यक्त होणारी लोकशाही असल्यामुळे वैचारिक तडजोड राजकिय नेत्याला करावी लागते. अशी तडजोड नाही केली तर त्या नेत्याला जबरी राजकीय किंमत मोजावी लागते. त्याच भीतीने मोठे राजकीय नेते आपल्या विचारांचा वारसा गुंडाळत भूमिका बदलत असतात. मात्र महाराष्ट्रात याला एकमेव अपवाद मला तरी दिसतो तो म्हणजे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते जितेंद्र आव्हाड..!

Advertisement

लेखक : ब्रम्हा चट्टे (मुक्त पत्रकार व सामाजिक अभ्यासक)

Advertisement

भीमा कोरेगाव प्रकरणानंतर महाराष्ट्रात मोठा गदारोळ माजला होता . विधानसभेमध्ये भीमा कोरेगावच्या दंगलीला जबाबदार धरत मनोहर भिडे यांना आरोपी करा म्हणून सत्ताधारी तात्कालिक भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जितेंद्र आव्हाड यांनी धारेवर धरलं होतं. त्याच वेळेस राष्ट्रवादी पक्षाने मात्र संदिग्ध भूमिका घेतली होती. त्याचबरोबर बमो पुरंदर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना सुद्धा पक्षाच्या भूमिकेचा विचार न करता जितेंद्र आव्हाड यांनी जाहीरपणे ब मो यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी विरोध दर्शवला होता. त्यानंतर शिव सन्मान परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आपला विरोध जाहीरही केला. अशी एक ना अनेक उदाहरण जितेंद्र आव्हाड यांच्या बाबत देता येतील. ज्यांनी त्यांच्या शिव फुले शाहु आंबेडकर विचारधारेल तडा जाईल अशी भूमिका कधीही घेतली नाही.

Advertisement

Advertisement

राजकीय भूमिकाच नाही तर मंत्री पदावर बसल्यानंतर आपण ज्या घटकांमधून आलो त्या गोरगरीब वंचित वंचित घटकांसाठी काहीतरी करता यावं ही धडपड आव्हाड यांच्यामध्ये सतत दिसत असते. मुंबईमधून फिरत असताना रस्त्यावरती टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचारला आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची परवड आव्हाड़ यांनी बघितली. आणी सामाजिक जाणीवेच्या भूमिकेतून त्यां लोकांची राहण्याची व्यवस्था म्हाडाच्या माध्यमातून करण्याची आव्हाड यांनी जाहीर केलं. म्हाडाच्या इमारतीमध्ये या रुग्णांची व्यवस्था होणार होती. त्या इमारतीतील काही नागरिकांनी विरोध केल्यामुळे आव्हाडांचा हा निर्णय रद्द होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती .पण अशा प्रतिकूल परिस्थिती मधून मार्ग

Advertisement

काढण्यामध्ये आव्हाड माहीर आहेत. त्यांनी मार्ग काढला आणि जसा शब्द दिला होता त्या शब्दाप्रमाणे या रुग्णांच्या नातेवाइकांची व्यवस्था आव्हाडांनी केली.  अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला बीडीडी चाळीचा ऐतिहासिक निर्णय ही आव्हाड यांच्याच मंत्रिपदाच्या कारकिर्दीत घेतला गेला. यावरून आव्हाड यांची राजकीय इच्छाशक्ती आपल्याला दिसून येईल.

Advertisement

Advertisement

मंत्रालयाच्या समोर अनेक मंत्र्यांच्या बंगल्यांच्या रांगा दिसतात. मात्र, त्या रांगेत सर्वाधिक गोरगरीब वंचित घटकांची गर्दी जर तुम्हाला कुठे दिसत असेल तर जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यासमोर. यावरून त्यांची कार्यशैली आणि लोकांमध्ये जाऊन त्यांची काम करण्याची पद्धत दिसून येईल. जितेंद्र आव्हाड यांच्या स्वतःच्या कळवा-मुंब्रा या मतदारसंघांमध्ये कोरोनाच्या काळात केलेले काम हे दखल घेण्याजोगे आहे.

Advertisement

आव्हाड संसदिय मार्गाने तर लढतच असतात. पण रस्त्यावरच्या लढाईतही ते नेहमीच अग्रही असतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपला मतदार शहरी असूनही नेहमी अक्रमक भूमिका आव्हाड़ घेतात. कळवा-मुंब्रा या हिंदू मुस्लिम संमिश्र मतदारसंघांमधून सलग निवडून येत राज्याच्या मंत्री पदावर विराजमान होणे ही साधी गोष्ट नाही. त्यांनी ते वेळोवेळी सिद्ध करून दाखवला आहे. उद्या आवड यांचा वाढदिवस म्हणून हा सगळा लेखप्रपंच. आव्हाड यांनी महाराष्ट्रातील पूर परिस्थिती व कोरोनाच्या काळामध्ये अनेकांनी आपले जिवलग गमावल्यामुळे वाढदिवस साजरा न करण्याचे जाहिर करत आपला संवेदनशील पण आता पुन्हा दाखवून दिला आहे. शिव-फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेवर नेहमी ठाम राहणाऱ्या, राज्याचा गाडा हाकण्याची क्षमता असणाऱ्या एकनिष्ठतेचे मापदंडाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

Advertisement

Advertisement

Leave a Reply