Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाईटच की.. डायनासाेरच्या हाडांची चोरी जोमात; महाराष्ट्राचे ज्युरासिक पार्क अनास्थेच्या फेऱ्यात..!

विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील पिजदुरा येथे डायनासाेरचे जीवाश्म सापडतात. त्यामुळे या स्थळाला जागतिकदृष्ट्या महत्वाचे स्थान आहे.

नागपूर : महाराष्ट्र असो की भारत देश. इथे ऐतिहासिक महत्वाच्या गोष्टी, वस्तू, ठिकाणे आणि पर्यटन स्थळांकडे दुर्लक्ष करणे ही ‘महान’ परंपरा आहे. फ़क़्त संस्कृती आणि परंपरेचे गोडवे गायचे आणि मस्त शांत राहायचे हीच आपली खरी परंपरा. त्याचाच फटका महाराष्ट्राचे ज्युरासिक पार्क म्हणून ओळख असलेल्या पिजदुरा येथील डायनासाेरची साइटला बसला आहे.

Advertisement

सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक अशोक सिंह ठाकूर यांनी याबाबत आता राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र, तोपर्यंत या भागातील अनमोल असा पर्यावरणीय व ऐतिहासिक ठेवा बऱ्यापैकी चोरीला गेला आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील पिजदुरा येथे डायनासाेरचे जीवाश्म सापडतात. त्यामुळे या स्थळाला जागतिकदृष्ट्या महत्वाचे स्थान आहे.

Advertisement

मात्र, महाराष्ट्र किंवा भारत सरकारला अजूनही त्याचे महत्व समजलेले नाही. त्याकडेच आता इतिहास अभ्यासकांनी लक्ष वेधले आहे. सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील डायनासाेरचे जीवाश्म नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अभ्यास करण्यासाठी येणारे देशी-विदेशी अभ्यासक हे जीवाश्म पळवून नेत असल्याने एक दिवस गावात जीवाश्मच शिल्लक राहणार नाहीत, अशीच भीती आता व्यक्त होत आहे.

Loading...
Advertisement

महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा व चंद्रपूर जिल्ह्यातील पिजदुरा येथेच डायनासाेरची साइट असल्याचे ब्रिटिशांनी १८६० मध्ये शोधले.  टेकडीवर हे जीवाश्म अजूनही सापडतात. मात्र, अनेकजण अभ्यास करण्याच्या नावाखाली येऊन हा अनमोल ठेवा चोरून नेत आहेत. त्यामुळेच हा अनमोल ठेवा जपण्यासाठी सरकारने या ठिकाणी जुरासिक पार्क घोषित करून साईट संरक्षित करण्याची मागणी ठाकूर यांनी केली आहे. त्यावर आता सरकारी यंत्रणा कोणती कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply