Take a fresh look at your lifestyle.

मोदींच्या महापूर मदतीनिमित्ताने NCP ने वेधले ‘त्याकडे’ लक्ष; पहा नेमके काय म्हटलेत त्यांनी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मागील वर्षीच्या महापुरात झालेल्या नुकसानीमुळे महाराष्ट्राला ७०० कोटींची मदत देऊन केली आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी याची घोषणा केल्यावर महाराष्ट्र भाजपने श्रेय घेताना महाविकास आघाडीवर टीका केली आहे. त्याला आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने प्रत्युत्तर दिले आहे.

Advertisement

यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात २०२०च्या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीसाठी राज्याने केंद्राकडे ३,७०० कोटींची मागणी केली होती. केंद्राच्या पथकाने पाहणी केल्यावर ७०० कोटींची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र ही मदत व यावर्षीचा महाराष्ट्रातील पूर यांचा दुरान्वयानेही संबंध नाही.

Advertisement

Advertisement

तर, पक्षाचे प्रवक्ते महेश तापसे यांनी म्हटलेय की, महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे ३ हजार ७२१ कोटींची मदत मागितली होती. त्यापैकी केवळ ७०१ कोटी मदत देण्यात आली आहे. भाजपचे नेते लोकांची दिशाभूल करुन पूरग्रस्तांसाठी तात्काळ केंद्राने मदत दिली असल्याचा संभ्रम निर्माण करत आहेत. त्यामुळे लोकांनी कृपया यावर विश्वास ठेवू नये. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी मंगळवारी पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ७०१ कोटींची मदत जाहीर केली. मात्र ही मदत २०२० साली झालेल्या अतिवृष्टीसाठीची आहे.

Advertisement

अजित पवार यांनी पुढे म्हटलेय की, यावर्षी पुरामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज सध्या राज्य सरकार घेत आहे. सर्व पाहणी झाल्यानंतर राज्य सरकार एकूण नुकसानीचा आकडा ठरवेल आणि केंद्राकडे त्यानुसार मदत मागेल. तसेच केंद्र सरकारचे पथक जर आताच पाहणी करण्यासाठी येत असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करु. गुजरातमध्ये केंद्राने नुकतीच एक हजार कोटींची मदत दिलेली आहे. त्यानुसार जर महाराष्ट्रालाही मदत केली तर चांगलेच होईल. पूरग्रस्तांसाठी तातडीने मदतीचे वाटप सुरु केले आहे. प्रशासनाला निधी काढण्याची परवानगी दिली आहे. आजही काही भागात पाणी भरलेले असल्यामुळे पंचनामे करण्यात अडचण येत आहे. जिथे पाणी ओसरले आहे, तिथे पंचनामे सुरु आहेत. मात्र, कुणीही मदतीपासून वंचित राहणार नाही.

Advertisement

Advertisement

Leave a Reply