Take a fresh look at your lifestyle.

नाना पटोललेंना NCP च्या पटेलांचा टोला; कॉंग्रेसमध्येच पाडले त्यांनी दोन गट..!

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांना टोला लगावताना प्रदेशाध्यक्ष असूनही त्यांच्या मताला अजिबात किंमत देत नसल्याचे सांगून टाकले आहे. एकूणच यानिमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पटोले यांना टोला लगावताना महाराष्ट्र काँग्रेस पक्षात दोन गट करून टाकले आहेत.

Advertisement

वास्तविक ही सोय फ़क़्त राष्ट्रवादीने त्यांच्या सोयीसाठी केली आहे. त्यामुळे आता आक्रमक असणारे पटोले त्यास कसे प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटेल यांनी असे म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, एच. के. पाटील हे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी असून फ़क़्त त्यांच्याच भूमिकेला आम्ही महत्व देतो.

Advertisement

एच. के. पाटील, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे तिन्ही नेते ज्येष्ठ नेते शरद पवारांना भेटल्याकडे पटेल यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही त्यांनीच भेट घेतल्यावर सगळेच स्पष्ट झाल्याचे सांगून पटेल यांनी पटोले यांना लक्ष्य केले आहे. ‘प्रशांत किशोर कन्सल्टंट आहेत. त्यामुळे ते कुठेही जाऊ शकतात, ते कुणालाही भेटू शकतात’ असेही पटेल यांनी म्हटले आहे.

Advertisement

पटेल म्हणाले की, राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये नाराजी नाही.  बाकीचे काय बोलतात याला महत्त्व नाही. महाविकास आघाडीचे जनक शरद पवार आहेत. आघाडीला त्यांचे मार्गदर्शन आहे. त्यांच्याच नेतृत्वात सरकार चालले आहे.

Advertisement

‘गुगल न्यूज’वर लाइव्ह न्यूज, लेख आणि मार्केट अपडेट वाचण्यासाठी https://bit.ly/3xX9aSV या लिंकवरून ‘कृषीरंग’ला फॉलो करा

Advertisement
Advertisement

Leave a Reply