Take a fresh look at your lifestyle.

म्हणून मंत्री भुजबळ थेट फडणवीसांच्या भेटीला; पहा काय म्हटलेय त्यांनी

नाशिक : नाशिकचे पालकमंत्री आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी आज चक्क विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीच्या हातातून सत्ता ताब्यात घेण्यासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आणखी एक आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Advertisement

मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळात फडणवीस आणि भुजबळ यांच्यातील राजकीय वादंग अवघ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यावर भुजबळ यांनी फडणवीस यांच्यावर अनेकदा जहरी टीका केली आहे. तसेच भाजपच्या टीम फडणवीसमधील नेते व कार्यकर्ते यांनीही भुजबळ यांच्यावर वेळोवेळी टीका केली आहे. आजच्या भेटीबद्दल फडणवीस यांनी कोणतीही माहिती किंवा सोशल मिडिया पोस्ट लिहिलेली नाही.

Advertisement

मात्र, हे सगळे मतभेद विसरून आज भुजबळ यांनी फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्याबद्दलचा फोटो ट्विटरवर टाकून त्यांनी म्हटले आहे की, आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाली. सोबत माजी खासदार समीर भुजबळ देखील होते. एकूणच ओबीसी आरक्षणाच्या राजकीयदृष्ट्या पेटलेल्या मुद्द्यावर ठोस तोडगा काढण्यासाठी दोन्ही नेते भेटले असल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply