Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

फडणवीसांची चुप्पीच; चव्हाणांच्या टीकेमुळे पेटलाय भाजप, पहा काय प्रत्युत्तर दिलेय पक्षाने

Please wait..

मुंबई : कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मुद्देसूद टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आताही त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या चुकीच्या मुद्द्यांवर बोट ठेऊन टीका केली होती. केंद्र सरकारनेच संसदीय समिती समोर दिलेल्या माहितीनुसार ९९% एसईसीसी डेटा त्रुटीरहित आहे. विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी चुकीची आकडेवारी सांगून जाणीवपूर्वक सभागृहाची आणि जनतेची दिशाभूल केल्याकडे त्यांनी लक्ष वेधले होते.

Advertisement

Advertisement
Loading...

यावर फडणवीस यांनी अजूनही प्रत्युत्तर दिलेले नाही. मात्र, फडणवीस यांची पाठराखण करण्यासाठी महाराष्ट्र भाजपने रिंगणात शड्डू ठोकला आहे. त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेस पक्षात असल्यामुळे ‘खोटे बोल पण रेटून बोल’ हीच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची रित आहे. स्वत:च्या चुका झाकण्यासाठी वेगळीच भूमिका घेत आधीच दिशाभूल करून मोकळे व्हायचे, ही त्यांची कार्यपद्धती राज्याला परिचित आहे. मुळात केंद्र सरकारने राज्यांना जे पत्र 3 जुलै 2015 रोजी पाठविले, त्या एसईसीसी डेटामध्ये 8.19 कोटी चुका सांगितल्या होत्या. 6.73 कोटी चुकांच्या दुरूस्तीनंतर सुद्धा 1.45 कोटी चुका शिल्लक राहिल्या.

Advertisement

पुढे त्यांनी म्हटले आहे की, राज्यनिहाय चुकांची वर्गवारी पाहिली तर सर्वाधिक 69.1 लाख चुका या महाराष्ट्रातील. इतर राज्यांतील चुकांचे प्रमाण हे 1 ते 14 लाख दरम्यान. म्हणजे 14 लाखांवर चुका कुठल्याच राज्यात नाही. आता प्रश्न निर्माण होतो तो पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात जी आकडेवारी गोळा झाली, त्यातच सर्वाधिक चुका कशा? लोकांची दिशाभूल करताना आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न न करता या प्रश्नाचे उत्तर त्यांनी आधी दिले पाहिजे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply