मुंबई : प्रीतम मुंडे यांना डावलून भागवत कराड यांना मंत्रिपद दिल्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा असतानाच त्यावर पडदा टाकताना त्यांनी अनेकांना कोपरखळ्या मारल्या आहेत. मुंबईत परतल्यावर राजीनामा दिलेल्या कार्यकर्त्यांची त्यांनी भेट घेऊन आपली भावना व्यक्त केली.
त्यांनी म्हटले आहे की, ‘महाराष्ट्राच्या मनातली मुख्यमंत्री’ म्हटलं म्हणून सगळं अवघड झाल्याचे काहीजण मला म्हणतात. परंतु, भाजपची मुख्यमंत्री होणार असं म्हटलं होतं, मला मुख्यमंत्री व्हायचंय असं कधीच म्हटलं नव्हतं. इथे लोक देशाचा पंतप्रधान व्हायचंय म्हणतायत ते चालतं असेल तर मग माझ्या म्हणण्याचा काय नेमका प्रोब्लेम आहे, असाच कळीचा मुदा त्यांनी उपस्थित केला आहे.
माझे नेते मोदी, अमित शहा आहेत. ज्यांना मी काय करते हे सांगायचे आहे ते आता जे. पी. नड्डा आहेत, असे सांगताना त्यांनी महाराष्ट्र भाजपचे नाव न घेता आपली नाराजी स्पष्ट केली आहे. पंकजा मुंडे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आणि नंबर वन नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव नेता म्हणून न घेऊन पुन्हा एकदा महाराष्ट्र भाजपसोबत असलेली नाराजी जगजाहीर केली असल्याची चर्चा सुरू झालेली आहे.