Take a fresh look at your lifestyle.

म्हणून पटोलेंच्या ‘त्या’ मुद्द्यामुळे ‘राष्ट्रवादी’ही झालीय आक्रमक; पहा कशामुळे पडलाय मिठाचा खडा..!

पुणे : सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू असलेला बेबनाव अनेकांच्या काळजाचे ठोके चुकवत आहे. त्याचवेळी यामुळे विरोधात असल्याने काहीही हाती लागत नसणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना यामुळे उभारी मिळत आहे. असाच प्रकार सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळे पुढे आलेला आहे. त्यांनी राष्ट्रवादीकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना मिळत असलेल्या सापत्न वागणुकीवर वाच्यता केल्याने राष्ट्रवादी कार्यकर्ते पेटले आहेत.

Advertisement

उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार हे पुण्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची काहीच कामे करत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. लोणावळा (जि. पुणे) येथे पक्षाच्या शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत त्यांनी याबद्दल सांगून टाकले आहे. त्याच्या बातम्या आलेल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत.

Advertisement

Advertisement

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राज्य उपाध्यक्ष अक्षय पाटील यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन ४ महिने झालेत आहेत. तरी ते अजून अध्यक्ष असताना असलेली सेक्युरिटी कव्हर तसेच मंत्रालयासमोरील A5 बंगला वापरत आहेत. या बंगल्याला त्यांनी काँग्रेस कार्यालय बनवलं आहे. प्रदेशाध्यक्ष यांना सरकारी बंगले देण्याचा नवीन GR सरकारने काढला आहे का?

Advertisement

त्यावर युवराज पाटील यांनी म्हटले आहे की, स्वतःच्या पक्षातील लोकांना पण नानाचे स्टेटमेंट खटकतात. पण अतिउत्साही नाना काही थाबेना.. मी पुन्हा येईल सारखा. मी स्वबळावर लढऊन मुख्यमंत्री होणारच असा स्वप्न बिंबवल दिसत मनावर.. असो.. तर, उमेश शिंत्रे यांनी म्हटलेय की, नाना आल्यावर काँग्रेस पक्षाला बळ मिळेल असे वाटले होते परंतु नाना काही उत्साह कमी करतील असे दिसत नाही. आणि नानांचे दिल्लीत किती वजन आहे हे देखील मागच्या काही दिवसांच्या दिल्लीतील बैठकांना थोरात साहेबांना बोलवले जाते. यावरून कळते की नांना का एवढे बडबड करतात ते.. यासह अनेकांनी पटोले यांना लक्ष्य केले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply