पुणे : राजकारण हा गुन्हेगारांचा अंतिम अड्डा असल्याचे वाक्प्रचार जगभरात सुप्रसिद्ध आहेत. भारत हा देश त्याला अजिबात अपवाद नाही. उलट या देशात तर गुन्हेगार असणारे थेट उच्चपदावर जाऊन बसू शकतात, आणि ते लोकमान्यही असू शकतात. सर्वच राजकीय पक्षात असेच चित्र आहे. अशावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या याच मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने नुकताच मंत्रीमंडळ विस्तार करून देशभरातील नाराजीची छटा दूर करण्याचा यशस्बी खेळ केला आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षांनी त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. यावर भाष्य करताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. त्यांनी गुन्हेगारी आणि अशा व्यक्तींना मंत्रीमंडळात स्थान देण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.
चाकणकर यांनी म्हटले आहे की, देशाच्या मंत्रिमंडळातील ४२% मंत्र्यांवर खून, खंडणी यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. गुन्हेगारांच्या शासनात आपण कायदा सुव्यवस्थेची अपेक्षा करणं व्यर्थ आहे. जिनके हाथ खून से रंगे हो , वो क्या इंसाफ देंगे आपको…? महत्वाचा प्रश्न करून त्यांनी भाजपला टोला हाणला आहे. त्यामुळे आता केंद्रातील सत्ताधारी आणि महाराष्ट्र राज्यातील विरोधक असलेले भाजपचे नेते यावर काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
हेही वास्तव आहे.. पण तुमचा पक्षही यात काही मागे नाही..😊😢 https://t.co/N7CdSpt8E9
Advertisement— Sachin Mohan Chobhe (बातमीजीवी) (@sachinChobhe) July 12, 2021
Advertisement