Take a fresh look at your lifestyle.

अखेर OBC समाजाचाच झाला विजय; निवडणुका रद्द करून दाखवल्याच..!

पुणे : देशभरात अनेकदा प्रशासकीय आणि राजकीय निर्णयावर आपली छाप सोडण्यात ओबीसी समाज यशस्वी ठरला आहे. आताही महाराष्ट्रात झेडपी व पंचायत समितीच्या निवडणुका रद्द करून या समाजाने एकीचे बळ दाखवून दिले आहे. यासाठी कारण कोणतेही दाखवलेले असो, समाजाने संघटितपणे केलेल्या विरोधामुळे निवडणुका रद्द करण्याची वेळ राज्य निवडणूक आयोगावर आलेली आहे.

Advertisement

त्यामुळे आता ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून तापलेले राजकारण थंडावेल अशीच शक्यता आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी स्थगित केल्या. त्यासाठी कोरोना स्थितीचे कारण देण्यात आलेले आहे.  गुरुवारी राज्य निवडणूक आयोगाची बैठक झाली. त्यात मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी राज्य सरकारकडून ही बाजू आग्रहाने मांडली.

Advertisement

त्यावरून तिसऱ्या लाटेची आणि ‘डेल्टा प्लस’चा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याची भीती लक्षात घेऊन राज्यातील ५ जिल्हा परिषदा व त्यांतर्गत ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे.

Advertisement

या टप्प्यावर प्रक्रिया स्थगित झाल्याने जेव्हा ती पुन्हा चालू होईल तेव्हा उमेदवारी मागे घेण्यापासून प्रारंभ होईल असेच चित्र आहे. कारण आतापर्यंत नामनिर्देशन अवैध ठरल्यासह अपिल करण्याची तारीख उलटून गेली आहे. दरम्यान, आघाडी सरकारने मागासवर्ग प्रवर्गाची आकडेवारी (इम्पिरिकल डेटा) न्यायालयात सादर केली नाही म्हणून ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. मुख्य सचिवांनी निवडणूक आयोगास पोटनिवडणुका रद्द करण्याची केलेली विनंती आयोगाने फेटाळल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा कुंटे यांच्यामार्फत प्रयत्न करून यासाठी प्रयत्न केले होते.

Advertisement

नीरव मोदीच्या बहिणीने मोदी सरकारला पाठवले 17 कोटी रुपये..! ईडीची माहिती.. नेमका प्रकार जाणून घेण्यासाठी वाचा..

Advertisement

OBC जनगणनेसाठी सातव यांनी धरला आग्रह; जनावरे, झाडांची गणना होते तर ही का नाही..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply