Take a fresh look at your lifestyle.

म्हणून समान नागरी कायदा पटलावर; भाजपासह देशालाही पडला होता विसर..!

दिल्ली : देशात समान नागरी कायदा लागू करावा असा हट्ट धरणारा भाजपा हा राजकीय पक्ष कधीच संपला आहे. आता त्या पक्षाला या मुद्द्याचा विसर पडलेला असतानाच अवघ्या देशालाही भारतीय राज्यघटनेच्या कलम ४४ मध्ये ज्या समान नागरी कायद्याची अपेक्षा व्यक्त केली गेली होती त्याची आठवण नाही. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाला आता त्या महत्वाच्या मुद्द्याची आठवण झाली आहे.

Advertisement

न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण टिप्पणीसह निकाल देताना म्हटले आहे की, ‘धर्म आणि जातीची बंधने हळूहळू संपुष्टात येत आहेत. यामुळे विवाह आणि घटस्फोटातही अडचणी येतात. तरुणांना या अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी देशात समान नागरी कायदा असावा.’ तलाकच्या एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने ही महत्वपूर्ण टिपण्णी केली आहे.

Advertisement

न्यायाधीश प्रतिभा एम. सिंह यांच्या कोर्टातून या निकालाची प्रत आता थेट केंद्र सरकारच्या कायदा मंत्रालयाकडे पाठवण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत. त्यामुळे या कायद्यावर पुन्हा एकदा चर्चा आणि भूमिका घेण्यास देशभरात सुरुवात होईल असेच चित्र आहे. यानिमित्ताने जर ही प्रक्रिया पुढे गेली तर देश समान होऊन सगळीकडे समानता नांदेल असेच चित्र आहे. मात्र, त्यासाठी आणखी किती वर्षे लागणार हे केंद्र सरकारच्या आणि एकूणच राजकीय पक्षांच्या भूमिकांवर ठरणार आहे.

Advertisement

या प्रकरणात पतीला हिंदू विवाह अधिनियमांनुसार घटस्फोट हवा होता, तर पत्नीचे म्हणणे होते की ती मीना जनजाती प्रवर्गातील घटस्फोट हवा होता. मग या याचिकेवर निर्णय हिंदू विवाह अधिनियमानुसार द्यावा की मीना जनजातीच्या वैयक्तिक कायदे- नियमांनुसार द्यायचा यावरून सुनावणी सुरू असताना कोर्टाने ही महत्वपूर्ण टिपण्णी केली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply