Take a fresh look at your lifestyle.

‘टेट’च्या मदतीने शिक्षक भरती झालीय ‘पवित्र’; पहा हजारोंना कशी मिळाली नियुक्ती थेट..!

पुणे : खासगी संस्था असो की सरकारी शैक्षणिक संस्था असोत, इथे सगळीकडे शिक्षक भरती म्हणजे खोऱ्याने पैसे ओढण्याचे साधन. प्राथमिक शिक्षक होण्यासाठी १० लाखांपासून सुरुवात होते. तर, प्राध्यापक भरतीचा आकडा ३० लाखांनाही सहजपणे पार करून जातो. अशा भरतीमध्ये आता राज्य सरकारची पवित्र प्रणाली मोठा अडसर ठरत आहे.

Advertisement

असा दावा राज्य सरकारचा आहे. राज्यातील ६,१०० शिक्षण सेवकांची पदे भरण्यास हिरवा कंदील मिळाला असून ही प्रक्रिया पवित्र पोर्टल प्रणालीच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबवण्याचे नियोजन आहे. डिसेंबर, २०१७ मध्ये आयोजित टेट परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र प्रणालीच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्यात येत आहे.

Advertisement

शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, पवित्र प्रणालीच्या माध्यमातून सुमारे १२ हजार ७० शिक्षक सेवक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून आतापर्यंत ५ हजार ९७० शिक्षण सेवक पदांवर नियुक्त्या देण्याबाबतची प्रक्रिया यापूर्वी फेब्रुवारी २०२० मध्येच पूर्ण झालेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उरलेल्या पदांच्या भरतीला हिरवा कंदील दाखवला आहे.

Advertisement

सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित तसेच अनुदान पात्र प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील शिक्षकांच्या रिक्त पदांवर या प्रक्रियेद्वारे भरती करण्यात येणार आहे.

Advertisement

उमेदवारांना निवडीची समान संधी व शिक्षणसेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांच्या निवडीसाठी भरती अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट) परीक्षेतील गुणांच्या आधाराने मुलाखत घेऊन ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. मात्र, मुलाखतीत गुणदान करताना ही पवित्र प्रक्रिया वेगळ्याच कचाट्यात अडकणार तर नाही ना, याचीही शंका अनेकांना वाटत आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply