औरंगाबाद : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा सध्या जोरदार तापला आहे. या मुद्द्यावर ऐन करोना कालावधीत भाजपने दणक्यात मोर्चे आणि आंदोलन केलेले आहे. मात्र, तरीही सर्वोच्च न्यायालयावर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. आरक्षण रद्द झाल्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याचे अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले आहे. त्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जोरदार नाराजी व्यक्त केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, पाच जिल्ह्यातील निवडणुका obc आरक्षण रद्द झाल्यामुळे पुढे ढकलण्याचे अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले… हा मुद्दा सरकारने firmly मांडण्याची आवश्यकता होती.. या क्षणी तीव्र संताप आणि प्रचंड शंकेने मन संपूर्ण व्यापलेले आहे..
पाच जिल्ह्यातील निवडणुका obc आरक्षण रद्द झाल्यामुळे पुढे ढकलण्याचे अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले… हा मुद्दा सरकारने firmly मांडण्याची आवश्यकता होती.. या क्षणी तीव्र संताप आणि प्रचंड शंकेने मन संपूर्ण व्यापलेले आहे..
Advertisement— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) July 6, 2021
Advertisement
तर, ‘ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे, येणाऱ्या काळात ताईसाहेब आपल्या नेतृत्वाखाली ओबीसी राजकीय आरक्षणासाठी तीव्र लढा देऊ…’, अशी प्रतिक्रिया चैतन्य मुंडे यांनी दिली आहे. मिलिंद कुलकर्णी यांनी ‘ताई हे खेकडा सरकार आहे….खेकड्याच्या चाली करूनच हे तग धरू शकतात.त्यामुळे या खेकड्याच्या नांग्या ठेचल्याच पाहिजे’ असे म्हटलेले आहे.
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.