Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘..तर १८ आमदार निलंबित झाले असते’; पहा नेमके असे का म्हटलेय अजितदादांनी

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भाजपवर जोरदार टीका केली. विरोधकांकडून विधानसभेचा अवमान करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. तसेच भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांच्या निलंबन प्रकरणी स्पष्टीकरण दिले. निलंबनाची कारवाई जाणूनबुजून केलेली नाही. त्यांच्या १८ आमदारांनी गोंधळ घातला असता तर १२ ऐवजी १८ आमदार निलंबित झाले असते. त्यामुळे बारा आमदारांची नियुक्ती केली नाही, म्हणून त्यांचे बारा आमदार निलंबित केले असे काहीही नाही, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर आधिवेशनातील विविध ठरावांची माहिती त्यांनी दिली.

Advertisement

राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या आधिवेशना दरम्यान भाजपने घातलेल्या गोंधळावर आता सत्ताधारी आघाडी सरकारच्या नेत्यांनी सडकून टीका केली आहे. आधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपने विधानसभेत गोंधळ घातला. त्यामुळे या प्रकरणी त्यांच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले. मात्र, बारा आमदारांची नियुक्ती केली नाही म्हणून काल भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांना निलंबित केल्याची चर्चा सुरू होती. मात्र, असे काहीही नसून निलंबनाची कारवाई जाणूनबुजून केलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

दरम्यान, विधानसभेच्या आधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चांगलाच गदारोळ उडाला. या प्रकरणी भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर संतप्त झालेल्या भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. विविध आरोप केले. आमदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी राज्यात काही ठिकाणी आंदोलनेही झाली. सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप-प्रत्यारोप तर सुरुच आहेत. त्यानंतर आजचा दुसरा दिवस सुद्धा वादळीच ठरला.

Loading...
Advertisement

आज भाजपने विधानभवनाच्या परिसरातच प्रति विधानसभा भरवली. या प्रकारामुळे आघाडी सरकारचे नेते चांगलेच संतापले. त्यांनी विरोधी सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली. त्यानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर कठोर शब्दांत टीका केली. विविध प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणी अद्याप भाजप नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply