Take a fresh look at your lifestyle.

ओबीसी आरक्षणावर फडणवीसांचा भाजप झालाय आक्रमक; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

मुंबई : अध्यक्षांच्या दालनाबाहेर विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्यावर भाजपाच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. परिणामी भाजपाने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

Advertisement

‘ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला उघडे पाडल्यामुळे भाजपाच्या १२ आमदारांवर खोटे आरोप करून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पण १२ नाही तर १०६ आमदारांचे निलंबन केले तरी भाजपा ओबीसीच्या मुद्द्यावरून मागे हटणार नाही.’ अशीच घोषणा फडणवीस यांनी देऊन टाकली आहे.

Advertisement

Advertisement

थोडी धक्काबुक्की झाली त्या संदर्भात आशिष शेलार यांनी भास्कर जाधव यांना सांगितलं की सर्वांच्यावतीने मी तुमची क्षमा मागतो आणि तो विषय संपला. त्यानंतर भास्कर जाधव यांनी आशिष शेलार, गिरीश महाजन यांची गळाभेट घेतली व तो विषय संपवून आम्ही बाहेर आलो. त्यानंतर या सरकारच्या काही मंत्र्यांनी मिळून आमचे आमदार निलंबित करण्यासाठी ही स्टोरी तयार केली, असा आरोप त्यांनी केला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply