Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पोलिसांना मोठी भेट; आता प्रत्येकजन होणार पीएसआय; पहा गृहमंत्र्यांची घोषणा काय आहे

पुणे : राज्यभरातील पोलिस शिपाई आपल्या निवृत्तीपर्यंत पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदावर जातील अशी सुखद घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केली आहे. त्याच्या या घोषणेचे पोलिसांनी स्वागत केले आहे.

Advertisement

पोलिस शिपाई आणि कनिष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारच्या वतीने ही सुखद घोषणा झाल्यावर याच्या बातम्या वेगाने व्हायरल होत आहेत. बहुतांश शिपायांना निवृत्तीच्या वेळी केवळ सहाय्यक पोलिस उप-निरीक्षक (ASI) पदावर निवृत्त व्हावे लागत असल्याची दखल घेऊन असा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Advertisement

पोलिस दलात 3 दशक सेवा दिल्यानंतरही शिपायांना केवळ ASI पदावर येऊन निवृत्ती मिळते. पोलिस शिपाई म्हणून रुजू झालेल्या प्रत्येकाला PSI पदावर पोहोचता यावे आणि निवृत्तीच्या 5 वर्षांपूर्वीपर्यंत या अधिकारी पदावर काम करता यावे अशी योजना बनवण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक शिपाई पीएसआय पदावर निवृत्त होणार असा एक प्रस्ताव गृहमंत्र्यांनी राज्य सरकारला पाठवण्याची तयारी केली आहे.

Loading...
Advertisement

पुण्यातील ग्रामीण पोलिसांच्या वतीने उभारण्यात आलेल्या एका पेट्रोल पंपाचे उद्घाटन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात त्यांनी ही महत्वाची घोषणा केली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply