Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. मोदींनी कौतुक केलेल्या ‘त्या’ला UP ATS कडून अटक; पहा नेमके काय घडलेय प्रकरण..!

Please wait..

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या तरुणाला उत्तर प्रदेशातील बेकायदा धर्मांतर रॅकेटप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यातील सिरसाळा (ता. परळी) गावचा तरुण इरफान खान ख्वाजा खान पठाण याला सोमवारी उत्तर प्रदेश एटीएस पथकाने दिल्लीत अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

Advertisement

इरफान हा केंद्रीय महिला आणि बालकल्याण विभागात मूकबधिर मुलांसाठी सांकेतिक संवाद दुभाषा तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. भाषणाचे सांकेतिक भाषेत उत्तम रूपांतर केल्याबद्दल इरफानला शाबासकी देऊन मोदींनी त्याचे कौतुक केल्याचा ‘इतिहास’ असतानाच आता हे प्रकरण पुढे आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. इरफानच्या अटकेेमुळे कुटुंबीयांना धक्का बसला असून त्याला या प्रकरणात विनाकारण गोवले असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

कानपूर, बनारस आणि नोएडा भागातील मूकबधिर मुले, तरुणी, महिलांना फूस लावून त्यांचे धर्मांतर केल्याच्या आरोपाखाली पोलिसांचा तपास चालू आहे. एटीएसने मुफ्ती जहाँगीर आलम कासमी आणि मोहंमद उमर गौतम या दोघासह दिल्लीत अब्दुल मन्नान ऊर्फ मन्नू राजीव यादव (रा.गुरुग्राम, हरियाणा), इरफान ख्वाजा पठाण (सिरसाळा, ता.परळी, जि.बीड) आणि राहुल प्रवीण भोला (रा.उत्तमनगर, नवी दिल्ली) या तीन जणांना अटक केलेली आहे.

Advertisement

इस्लामिक दवा सेंटरच्या नावाखाली गरीब, मूकबधिर, मुले,तरुणांना पैसे, नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून कासमी आणि उमर गौतम हे धर्मांतर करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मर गौतम याने आतापर्यंत १ हजार लोकांचे धर्मांतर केल्याची कबुली उत्तर प्रदेश पोलिसांना दिली असून दुभाषा म्हणून काम करता-करता इरफान याने मूकबधिर मुलांना आमिष दाखवून त्यांचे बेकायदा धर्मांतर केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply