Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकार व भाजपची ‘ती’ चूक नडली? OBC आरक्षणावर काँग्रेसने केलाय मोठा आरोप

नाशिक : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी ओबीसी आरक्षण हा मुद्दा आहे. मराठा आरक्षणावर पक्षाचे झेंडे बाजूला ठेऊन पाठींबा देणारे सर्वच राजकीय पक्ष ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मात्र पक्षाच्या झेंड्यासह उतरत आहेत. यावरून महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप यांच्यात आरोपांच्या फैरी सुरू आहेत. अशावेळी आता महाराष्ट्र काँग्रेस पक्षाने भाजपवर मोठा आरोप केला आहे. आता यावर भाजप कोणती प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे की, ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्याला सध्याचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे. ओबीसींचे हे राजकीय आरक्षण घालवून ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा भाजपाचा डाव आहे.मोदी सरकार विरोधात २६ जून रोजी काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांना पत्र लिहून ओबीसींचा इम्पिरीकल डेटा देण्याची मागणी केली पण केंद्राने तो दिला नाही. केंद्राने ओबीसींचा डेटा दिला नाही, त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले.

Loading...
Advertisement

पुढे त्यांनी म्हटलेय की, सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश असून संघाच्या इशा-यावर चालणारे केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आरक्षण संपविण्यासाठीच काम करत आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply