नाशिक : जागतिकीकरणाच्या युगात जिल्हा परिषद शाळांचे रुपडे बदलण्याचे अभियान राज्यभरात सुरू आहे. युनिफॉर्म बदलासह डिजिटल क्लासरूम आणि सेमी इंग्रजीमध्ये शिफ्ट होत असलेल्या झेडपी शाळा आता चकाचक दिसाव्यात असे सरकारलाही वाटत आहे. त्यासाठी त्यांनी सुंदर माझे कार्यालय अन झीरो पेंडन्सी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून सुंदर माझे कार्यालय अन झीरो पेंडन्सी असा महत्वपूर्ण आणि शाळांना चकाचक करण्याचे अभियान राबवण्याच्या सूचना शिक्षण संचालक कार्यालाय्ने दिलेल्या आहेत. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा म्हंजे भिंतींना तडे, घाणीचे साम्राज्य आणि शाळेभोवती झुडुपांचे जंगल असेच चित्र आहे. हेच चित्र पालटण्याच्या अभियानाला गती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमधून सुंदर माझे कार्यालय या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या सुचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी दिल्या आहेत.
अभियानातील महत्वाचे मुद्दे |
राज्यात जिल्हा परिषद व खासगी शाळांची संख्या १. ०६ लाख, पैकी ६५४५० शाळा जिल्हा परिषदेच्या |
निरुत्साही वातावरणात विद्यार्थ्यांनाही शिक्षण घेण्यास अडचणी |
कोविडमुळे मागील वर्षभरापासून शाळा बंद असल्याने शाळेची साफसफाई नाही |
शाळेच्या परिसरातील वातावरण काम करण्यायोग्य व उत्साहवर्धक ठेवण्याच्या सुचना |
शाळांमधील सुंदर माझे कार्यालय तसेच झिरो पेंडन्सी कार्यक्रमाचा आढावा शिक्षणाधिकारी कार्यालय घेणार |
गटशिक्षणाधिकारी कार्यालय व शिक्षण विभागातून झिरो पेंडन्सीमुळे प्रशासकीय कामकाज गतीमान होणार |
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.