मराठा आरक्षण आंदोलन : राज्य सरकारचे छत्रपती संभाजीराजेंना ‘हे’ आवाहन; पहा नेमके काय म्हटलेय मंत्री पाटलांनी
कोल्हापूर : मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरात छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वात मराठा क्रांती मूक आंदोलन चालू आहे. भार पावसात आंदोलन सुरू असून राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थिती लावत मंत्री सतेज पाटील यांनी यावेळी संभाजीराजेंना आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मागण्यांसाठी राज्य सरकार १०० टक्के सकारात्मक आहे.
छत्रपती संभाजीराजेंसह आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने यांच्यासह खूप महत्वाचे व्यक्ती सहभागी झालेले आहेत. सतेज पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दिलीप वळसे पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात या सर्वांना संभाजीराजेंशी चर्चा करून मार्ग काढायचा आहे. सरकारने एक पाऊल पुढे टाकून सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यासाठी आपण मुंबईत बैठकीला यावे. सर्वांच्या भूमिकेला अनुसरुनच सरकारची भूमिका आहे.
सतेज पाटील यांनी पुढे म्हटले की, २३ मार्च २०१४ ला राणे कमिटीने पहिला अहवाल दिल्यावरच खऱ्या अर्थाने तांत्रिकदृष्ट्या मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका वेगवेगळ्या माध्यमातून घेण्यास सुरुवात झाली. सरकारने गायकवाड आयोग नेमून राज्यभर दौरा करुन मराठा समाजाची परिस्थिती, अडचणी यासंबंधी डेटा संकलित केला. २०१८ साली हा कायदा पारित केला पण दुर्दैवाने हायकोर्टात टिकलेला कायदा सुप्रीम कोर्टात टिकला नाही. करोनाच्या संकटात संयमाने आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याबद्दल मला संभाजीराजेंचेही आभार. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने तात्काळ दिलीप भोसले यांच्या नेतृत्वात कमिटी नेमलेली आहे.
सुप्रीम कोर्टातील वकिलांची टीम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने बदलली नव्हती याकडे सतेज पाटील यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की, जी टीम गेल्या पाच वर्षांपासून होती तीच कायम ठेवण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली होती. विधीमंडळात सर्वानुमते ठराव पास झाला असताना राज्य सरकार कमी पडल्याचे बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही. भोसलेंचा अहवाल आल्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण पंतप्रधानांना भेटले आणि चर्चाही केली आहे.
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.