दिल्ली : जमीन खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह आणि समाजवादी पक्षाचे नेते तथा माजी मंत्री पवन पांडेय यांनी केल्याने देशभरात खळबळ उडालेली आहे. त्यावर ट्रस्टने आपली बाजू मांडली आहे.
अकरा मिनिटांपूर्वी जी जमीन दोन कोटी रुपयांत विकली गेली तीच जमीन ट्रस्टने १८.५ कोटी रुपयांत खरेदी केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे. जमीनीच्या या दाेन्ही व्यवहारांत डाॅ. अनिल मिश्रा हेच साक्षीदार क्रमांक १ राहिले आहेत. डाॅ. मिश्रा हेच ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांचे ‘सायनिंग अॅथाॅरिटी’ असल्याचे आरोप होत आहे. याबाबत ट्विटरवर अनेक कागदपत्रे शेअर केली गेली आहेत. यावरून गोंधळ उडाला आहे. त्यावर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत रॉय यांनी पलटवार केला आहे.
त्यांनी मांडलेले मुद्दे असे :
- जमिनीच्या खरेदीवरुन करण्यात येणार आरोप राजकीय षडयंत्राचा भाग
- मंदिरासाठी खरेदी करण्यात येणारी जमीन बाजार भावाच्या तुलनेत कमी दरात खरेदी करण्यात येत आहे
- आतापर्यंत मंदिरासाठी खर्च करण्यात आलेल्या प्रत्येक पैशाचा हिशोब रेकॉर्डमध्ये आ
- सुलतान अन्सारी आणि रवि मोहन तिवारी यांनी सुमारे दहा वर्षांपूर्वी कुसुम पाठक आणि हरीश पाठक यांच्याकडून बाग बिजेरची जमीन खरेदी केली होती
- जमिनीचा दर दोन कोटी रुपयांत निश्चित करून याची नोंददेखील करण्यात आली होती
- ही जमीन विकत घेण्याची इच्छा व्यक्त केल्यावर सुल्तान अन्सारी आणि रवि मोहन तिवारी यांनी पाठक कुटुंबिंयाकडून बाजार भावाने दर निश्चित केले व आजच्या दरानुसार ते मंदिर ट्रस्टला विकले
यामध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नसून फक्त रामभक्तांना दिशाभूल करण्यासाठी हे राजकीय षडयंत्र असल्याचे ट्रस्टचे सरचिटणीस चंपत रॉय यांनी म्हटले आहे. जमिनीच्या खरेदीवरुन करण्यात येणार आरोप राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप रॉय यांनी केला आहे.
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.