Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भाजपने ठरवून ओबीसींचे नुकसान केले; पहा नेमका काय आरोप केलाय पटोलेंनी फडणविसांवर

नांदेड / नागपूर : काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा महाराष्ट्रात पक्के करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजप आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भाजपने ठरवून ओबीसींचे नुकसान केले आहे. त्यांच्या या आरोपाला आता फडणवीस काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

बुलडाणा जिल्ह्यात मेहकर येथील भेटीनंतर चिखली येथे पटोले यांनी रात्री उशिरा करोना आढावा बैठक घेतली. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक तर त्यांनी चक्क रात्री १.३० वाजता घेतली. पटोले यांच्या या बैठकीची चर्चा सध्या महाराष्ट्रभर आहे. त्यांनी म्हटले आहे की, ऑक्टोबरमध्ये दुसरी लाट येत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना अंधारात ठेवले. मार्चच्या पहिल्या आठवड्यात भारत कोरोनामुक्त झाल्याचे सांगून उलट पाच राज्यांच्या निवडणुका घेतल्या. परिणामी करोनाने हातपाय पसरले आणि हजारो निष्पाप भारतीयांचे त्यात बळी गेले.

Advertisement

पटोले यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेऊन म्हटले आहे की, तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी पदाचा दुरुपयोग करून नागपूर जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. भंडारा, गोंदिया, पालघर, नंदुरबार व वाशीम या चार जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊ दिल्या नाही. पुढे जिल्हा परिषद निवडणुकीचा मुद्दा उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयात गेला. ओबीसी जनगणनेचा आकडा केंद्र सरकारने न दिल्याने आणि रेकॉर्ड नसल्याने व रेकॉर्ड दाखवण्यात आले ते चुकीचे असल्याने ओबीसी सदस्यांना अपात्र करण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे.

Loading...
Advertisement

कोर्टाने सांगून दोन वर्षे होऊनही आयोग बसवला गेलेला नाही. फडणवीस आरोप करतात. मात्र, केंद्रात त्यांच्याच भाजपची सत्ता आहे. आयोग न बसवल्याने असे झालेले आहे. ओबीसी समाजाचे नुकसान करण्याचे काम भाजपने ठरवून केले आहे, असा गंभीर आरोप पटोले यांनी केलेला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply