Take a fresh look at your lifestyle.

मराठा आरक्षणाबाबत अजितदादा यांनी म्हटलेय असे; पहा काय करणार आहे राष्ट्रवादी

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांचा राजकीय पक्ष. या पक्षाला आज 22 वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यानिमित्ताने आयोजित प्रदेश कार्यालयात मोठा उत्साह आहे. तसेच सोशल मीडियामध्येही अनेकांनी पक्षाचे अभिनंदन केले आहे.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटले आहे की, पेट्रोल-डिझेलचे दर शंभरी गाठत आहेत. घरगुती गॅसचे दर वाढले आहेत. विमान-रेल्वेचा प्रवास महागला आहे. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या सर्व प्रश्नांवर देखील आपल्याला काम करायचे आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारतर्फे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेऊन आरक्षण, जीएसटी, पीक विमा, १४ व्या वित्त आयोगाचे पैसे मिळावेत, तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशा प्रकारच्या आग्रही मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत.

Advertisement

NCP on Twitter: “मराठा समाजाचे आरक्षण, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण आणि इतर प्रश्नांवर देखील काम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे. कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, अशी भूमिका @NCPspeaks ची आहे – @AjitPawarSpeaks #NCP22 #NCP #FoundationDay https://t.co/x4sEAlgt9Q” / Twitter

Advertisement

त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर म्हटले आहे की, मराठा समाजाचे आरक्षण, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण आणि इतर प्रश्नांवर देखील काम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे. कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, अशी भूमिका पक्षाची आहे. आज राज्यात राष्ट्रवादीचा सहभाग असलेले महाविकास आघाडीचे सरकार आहे. जनतेवर अन्याय होईल असा कोणताही निर्णय आम्ही होऊ देणार नाही. संकटे कितीही येवोत हा महाराष्ट्र कधीही झुकला नाही, झुकणार नाही. संकटांवर मात करुन हा महाराष्ट्र सर्वांच्या पुढेच राहील, अशी ग्वाही देतो.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply