Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

काळाचा घाला..! उल्हासनगरमध्ये इमारत दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू, सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर

मुंबई : उल्हासनगर येथील नेहरु चौक परिसरातील ‘साईशक्ती’ या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर ठाणे येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Advertisement

दरम्यान, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. नंतर मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली. तसंच धोकादायक पद्धतीने इमारत उभारणाऱ्या बिल्डरविरोधात कारवाई करण्याची सूचना शिंदे यांनी पालिका आयुक्तांना केली आहे.

Advertisement

उल्हासनगरमधील ‘साईशक्ती’ इमारतीमध्ये एकूण 29 फ्लॅट होते. शुक्रवारी (29 मे) रात्री दहाच्या सुमारास स्लॅब कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. त्यामुळे काही रहिवाशांनी बाहेर पळ काढला. इमारतीत अडकलेल्या लोकांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.

Advertisement

याबाबत माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान, पोलिस, ठाणे महापालिकेची TDRF टीम घटनास्थळी दाखल झाली. या पथकांनी ढिगारा बाजूला करुन सात मृतदेह बाहेर काढले. मृतांमधील चार जण एकाच कुटुंबातील आहेत.

Loading...
Advertisement

मृतांची नावे : पुनीत बजोमल चांदवाणी (वय 17), दिनेश बजोमल चांदवाणी (वय 40), दीपक बजोमल चांदवाणी (वय 42), मोहिनी बजोमल चांदवाणी (वय 65), कृष्णा इनूचंद बजाज (वय 24), अमृता इनूचंद बजाज (वय 54), लवली बजाज (वय 20).

Advertisement

उल्हासनगरमध्येच गेल्याच आठवड्यात मोहिनी पॅलेस इमारत दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला होता. 1994 -95 मधील काही धोकादायक इमारतींचे स्लॅब पालिकेने तोडले होते. मात्र, संबंधित बिल्डरने हेच स्लॅब वेल्डिंग करत परत जोडल्याने या दुर्घटना होत असल्याचा आरोप होत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply