Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मराठा आरक्षण : करोनाकाळातही भाजपची रस्त्यावरची लढाई; न्यायालयातील लढ्याकडे दुर्लक्ष कायम

पुणे : मराठा आरक्षणाचा मुद्दा हा रस्त्यावरच्या लढाईचा मुद्दा नसून संविधानिक नियमांच्या चौकटीत बसवण्याचा मुद्दा असल्याचे अनेक कायदेतज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, तरीही आरक्षण रद्द झाल्यावर आता रस्त्यावरचे राजकीय वातावरण तापले आहे. त्याला केंद्रात सत्तेत असलेल्या आणि महाराष्ट्रात विरोधात असलेल्या भाजपनेही ऐन करोनाकालावधीत हवा दिली आहे. त्यासाठी भाजपने थेट ‘नियोजन’ करून टाकले आहे. त्याचवेळी न्यायालयीन लढाईत कोणताही राजकीय पक्ष एकमेकांना मदतीला अजिबात तयार नाही.

Advertisement

प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी कोल्हापूरमध्ये सांगितले की, मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनामध्ये भाजप पक्षाचा बिल्ला आणि बॅनर बाजूला ठेवून सार्वजन सहभागी होतील. याचे नेतृत्व खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी करावे. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. आरक्षण मिळावे म्हणून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यासाठी राज्य सरकारला ४ जूनपर्यंत मुदत दिलेली आहे. नंतर फेरविचार याचिका दाखल करता येणार नाही.

Advertisement

भाजपने पक्षाच्या मराठा नेत्यांना मैदानात उतरवले असून शुक्रवारपासून त्यांचे तीन दिवसांचे दौरे सुरू केले आहेत. भाजपचे कार्यकर्ते आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील कार्यकर्ते यांच्या बैठका घेण्याचे नियोजन झालेले आहे. प्रवीण दरेकर (रायगड), प्रसाद लाड (रत्नागिरी), रवी चव्हाण (सिंधुदुर्ग), आशिष शेलार (नांदेड, बीड), नारायण राणे (पुणे, ठाणे), हर्षवर्धन पाटील (सातारा), संभाजी पाटील निलंगेकर (औरंगाबाद, जालना), नरेंद्र पाटील (बुलडाणा, अकोला), राधाकृष्ण विखे पाटील (नाशिक, नगर) असे नियोजन भाजपने नेत्यांना देऊन टाकले आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, भाजप प्रवक्ते केश‌व उपाध्ये यांनी मराठा आरक्षणविरोधी याचिकांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांनी रसद पुरवली जात असल्याचे म्हंटले आहे. तर, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी टीका करताना म्हटले आहे की, आरक्षणाविरोधात लढणाऱ्या “सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’चे भाजप व संघाचे नागपूर कनेक्शन उघड आहे. या न्यायालयीन लढाईत आरक्षणविरोधी लोक व संस्थांना रसद पुरवून भाजपनेच दगाबाजी केली आहे का, असाही प्रश्न आहे. आंदोलनामुळे कोरोनाचा भडका उडाला तर भाजप जबाबदार असेल.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply